Coronavirus in India: फेब्रुवारी 2021 पर्यंत देशात कोरोना व्हायरस सक्रीय रुग्णांची संख्या असू शकते फक्त 40,000; आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती
Coronavirus प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

कोरोना विषाणूच्या (Coronavrisu) बाबतीत भारतावरील संकट काही टळले नाही. अजूनही भारतामध्ये हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. मात्र आता यामध्ये एक दिलासादायक बाबा समोर येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, पुढील वर्षांच्या फेब्रुवारी महिन्यात भारतामधील कोरोना व्हायरस सक्रीय रुग्णांची संख्या कमी होऊन 40,000 हजारांवर येईल. अनेक बड्या शास्त्रज्ञांच्या संशोधनावर आधारित गोष्टींच्या आधारे हर्षवर्धन यांनी हे सांगितले आहे. तसेच लसीकरण प्रक्रियेसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून कर्मचार्‍यांना आणि इतर लॉजिस्टिक्सना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कोरोनाच्या वाढीवर आळा घालण्यासाठी भारत आपले प्रयत्न कमी करणार नाही, असेही हर्षवर्धन यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री म्हणाले, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने जगातील अनेक शास्त्रज्ञांच्या मदतीने भविष्यात कोरोना प्रकरणांचे मूल्यांकन मॉडेल तयार केले आहे. वैज्ञानिकांच्या तंत्रज्ञानाच्या आधारे संशोधनातून असे समोर आले आहे की, येत्या तीन ते चार महिन्यांत देशात कोरोनाची प्रकरणे कमी होतील आणि फेब्रुवारी 2021 पर्यंत देशात केवळ 40 हजार सक्रिय प्रकरणे राहतील.’ आरोग्यमंत्र्यांनी लसीबद्दल सांगितले की, ‘लसीकरण, कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण आणि इतर गोष्टींची वेळ येईल तेव्हा राज्य सरकारांशी चर्चा केली जाईल. आमचा विश्वास आहे की आता देशात कोरोनाची प्रकरणे वाढणार नाहीत.’

रविवारी, केंद्राने म्हटले की, साथीच्या आजाराच्या नियमांचे पालन केल्यास पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस फेब्रुवारी-अखेरीस सक्रिय प्रकरणे कमी होतील. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस आणि तिची वितरण प्रणाली संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, कोरोनाची लस पुढील वर्षाच्या सुरूवातीस भारतात येणे अपेक्षित आहे. (हेही वाचा: कॅबने प्रवास करणार्‍यांसाठी मोठी बातमी; उबरने लाँच केले नवे फीचर, मास्कवाला सेल्फी पाठवणे बंधनकारक)

दरम्यान, दरम्यान, आज सलग तिसर्‍या दिवशी सक्रीय प्रकरणांची संख्या आठ लाखांपेक्षा कमी राहिली. सध्या कोरोना व्हायरस संसर्गाची 773,497 प्रकरणे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 6,667,565 वर गेली आहे.