Coronavirus in India: भारतात मागील 24 तासांत 17,296 रुग्णांची सर्वात मोठी वाढ तर 407 जणांचा मृत्यू; देशातील कोरोना बाधितांचा आकडा 4,90,401 वर
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट देशभरात दाहक रुप धारण करु लागले आहे. सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा चिंतेत भर घालत आहे. मागील 24 तासांत कोविड-19 (Covid-19) चे 17,296  नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. तर 407 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या भरीसह भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 4,90,401 वर पोहचला आहे. त्यापैकी 1,89,463 अॅक्टीव्ह केसेस म्हणजेच या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 2,85,637 रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्णपणे रिकव्हर झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान देशात एकूण 15301 रुग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे बळी गेला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयातून (Ministry of Health & Family Welfare) देण्यात आली आहे. (मुंबईत आज 1,365 नवे कोरोना रुग्ण, 58 मृत्यूंची नोंद; शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 70,990 वर)

देशातील महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, गुजरात येथे कोरोना बाधितांची संख्या अधिक असून मुंबई, दिल्ली मध्येही कोविड-19 चा विळखा तीव्र आहे. दरम्यान सर्वत्र कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 62369 वर पोहचला असून 73792 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. तर 6739 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ANI Tweet:

अनलॉक 1 च्या माध्यमातून सेवा-सुविधा पुन्हा सुरु झाल्या आहेत. आता राज्यात 28 जून पासून सलून व्यवसाय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र 12 ऑगस्ट पर्यंत लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आली असून लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.