Coronavirus In Mumbai: मुंबईत आज कोरोना व्हायरस रुग्ण संख्येत पून्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या अपडेटनुसार, आज मुंबईत एकूण 1,365 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत, याशिवाय 58 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची सुद्धा नोंद झाली आहे. एकूण आकडेवारी पाहता राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 70 हजार 990 वर पोहचली आहे तर 4 हजार 60 जणांनी आजवर कोरोनामुळे जीव गमावला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने कंटेन्मेंट झोनची (Containment Zone) नवी यादी जाहीर केली आहे. तुम्ही राहत असणारा परिसर नव्या कंटेनमेंट झोन च्या यादीत येतो का हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या धारावी परिसरात आता कोरोनाचा वेग मंदावला आहे. आज धारावीमध्ये केवळ 11 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 210 वर पोहोचली आहे. यापैकी 81 जणांचा मृत्यू झाला आहे
PTI ट्विट
Mumbai reports 1,365 new coronavirus patients, 58 deaths; tally of cases in city rises to 70,990 and death toll to 4,060: civic body
— Press Trust of India (@PTI_News) June 25, 2020
दरम्यान, महाराष्ट्रात आज तब्बल 4 हजार 841 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 192 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 47 हजार 741 वर पोहचली आहे. यापैकी 6 हजार 931 जणांचा मृत्यू झाला आहे.
दिलासादायक वृत्त असे की, आज एकाच दिवशी 3 हजार 661 रुग्णांना घरी सोडण्यात आहे. राज्यातील कोरोनामुक्तांची संख्या 77 हजार 453 वर पोहचली आहे. आजही मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक 2 हजार 844 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 52 टक्के एवढा आहे.