Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधिताचा आकडा 11,92,915 वर; मागील 24 तासांत COVID19 च्या 37,724 नव्या रुग्णांसह 648 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) उद्रेक सुरुच आहे. कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असून मागील 24 तासांतही त्यात मोठी भर पडली आहे. मागील 24 तासांत देशात 37,724 कोरोना बाधित नवे रुग्ण आढळून आले असून 648 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 11,92,915 वर पोहचला आहे. त्यापैकी 411133 सक्रीय रुग्ण (Active Cases) आहेत. म्हणजेच या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 7,53,050 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. दरम्यान देशात एकूण 28,732 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Ministry of Health and Family Welfare) देण्यात आली आहे.

देशातील कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत असला तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील चांगली आहे. वरील आकडेवारी पाहता देशात सक्रीय रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. परिणामी देशाचा रिकव्हरी रेट सातत्याने सुधारत आहे. सरकार, आरोग्य यंत्रणांच्या अथक प्रयत्नांमुळे ठोस औषध किंवा लस उपलब्ध नसतानाही कोरोना संसर्गावर मात करणे शक्य होत आहे. तसंच नियमांचे पालन करुन नागरिकही सरकारला साथ देत आहेत. (महाराष्ट्रात कोरोना व्हायरस चा धुमाकूळ; पहा आजची कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी)

ANI Tweet:

कोरोना बाधितांच्या वाढत्या आकड्यामुळे देशात चिंतेचे वातावरण असले तरी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीच्या सकारात्मक परिणांमुळे आता आशचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील यशाकडे लागले आहे. ही लस उपलब्ध झाल्यास कोरोना व्हायरस संकटावर मात करणे नक्कीच सोपे होईल.