Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) थैमान सुरुच आहे. मागील 24 तासांत कोरोनाचे 10,974 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2003 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या नव्या रुग्णांची भर पडल्यानंतर देशातील कोरोना बाधितांचा आकडा 3,54,065 वर पोहचला असून 1,55,227 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 1,86,935 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान देशातील कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 11903 वर पोहचला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) दिली आहे. (महाराष्ट्रात 1 लाख 13 हजार 445 जणांना कोरोनाची लागण; राज्यात आज 2 हजार 701 नव्या रुग्णांची नोंद तर, 81 मृत्यू)

महाराष्ट्रासह तामिळनाडू, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग सर्वाधिक आहे. तर मुंबई, दिल्ली या शहरांमध्ये कोविड-19 च्या रुग्णांची वाढती संख्या पाहायला मिळत आहे. दरम्यान टप्प्याटप्प्याने जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

ANI Tweet:

देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. बुधवार, 17 जून दिवशी पंतप्रधान दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांसोबत चर्चा करण्यात येईल. काल 16 जून रोजी पंजाब, केरळ, गोवा, उत्तराखंड, झारखंड आणि ईशान्य भारतातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत मोदींनी संवाद साधला. दरम्यान कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेतली जाणारी ही सहावी बैठक असेल.