महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या 24 तासात 2 हजार 701 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 1 लाख 13 हजार 445 वर पोहचली आहे. यापैकी 5 हजार 537 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 57 हजार 851 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे. सध्या भारतात एकूण 3 लाख 43 हजार 091 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 9 हजार 900 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 80 हजार 13 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- धारावीत आज 21 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण कोरोबाधित रुग्णांची संख्या 2089 वर पोहोचली
एएनआयचे ट्विट-
2701 #COVID19 cases & 81 deaths reported in Maharashtra in the last 24 hours. Total number of cases in the state is now at 113445, including 57851 discharged and 5537 deaths: Maharashtra Health Department pic.twitter.com/OxP1fx5giv
— ANI (@ANI) June 16, 2020
कोरोना विषाणूने महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना राज्यात आज मोठ्या संख्येत रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज 5 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.