HDFC (Phoot Credits-Twitter)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या काळात गोरगरिबांचे हाल होत असून त्यांनी आपल्या घरची वाट पकडली आहे. कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी विविध स्तरातून आर्थिक मदत केली जात आहे. भारतात अनेक उद्योजक आणि सेलिब्रेटी मंडळींनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहाय्यता निधीत आपापल्या परीने मदत जमा केली आहे. याच आता पार्श्वभुमीवर एचडीएफसी ग्रुपकडून (HDFC Group) पीएम केअर्स फंडसाठी (PM Cares Fund) 150 कोटी रुपयांचे दान देण्यात आले आहे.

तसेच आयटी कंपनी विप्रो लिमिटेड  आणि विप्रो एंटरप्राइजेस लिमिटेड अजीम प्रेमजी फाऊंडेशन यांनी सुद्धा कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.  या दोन्ही संस्थांनी मिळून कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत 1125 कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. त्याचसोबत कोरोना विषाणूमुळे अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ लागला आहे. दरम्यान अनेकजण सरकारला अर्थिक मदत करताना दिसत आहे. तर मध्य प्रदेश येथील एका 82 वर्षीय वृद्ध महिलेने सुद्धा आपल्या पेन्शनच्या पैश्यामधून सरकारला 1 लाख रुपयांची आर्थिक मदत  केली आहे.(Coronavirus In India: भारतात गेल्या 12 तासात 131 नव्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांची भर पडल्याने आकडा 1965 वर पोहचला) 

दरम्यान, कोरोना व्हायसरसच्या पार्श्वभुमीवर मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांचे कौतुक डब्लूएचओ यांच्याकडून करण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी विविध स्तरातून मदतीचे हात पुढे केले जात आहेत. ऐवढेच नाही तर हातावर पोट असणाऱ्या नागरिकांनी राज्यातून स्थलांतर न करता त्यांसाठी जेवणापासून ते आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत सर्व सोय करण्यात आली असल्याचा निर्णय ही सरकारकडून जाहिर  करण्यात आला आहे.