Coronavirus: कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या मार्गदर्शक सुचना, राज्यांनुसार जाणून घ्या काय असणार नियम
Coronavirus (Photo Credits: PTI)

Coronavirus:  देशातील तीन राज्यात कोरोनाचे दोन नवे स्ट्रेन आढळून आल्याने डॉमॅस्टिक विमानसेवेसाठी काही नियमांत बदल करण्यात आले असून त्या संदर्भातील मार्गदर्शक सुचना सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा समावेश असून प्रवाशांना मास्क घालणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचसोबत त्यांच्याकडे कोविड19 च्या RT-PCR चे रिपोर्ट्स निगेटिव्ह असणे गरजेचे असणार आहे.(Coronavirus: केंद्राकडून राज्यांना COVID-19 Vaccination वाढविण्याच्या सूचना)

मंगळवारी केंद्राने असे म्हटले की, महाराष्ट्र, केरळ आणि तेलंगणा मध्ये कोविड19 चे दोन नवे स्ट्रेन आढळून आले आहेत. पण यामधील पहिल्या दोन राज्यात कोरोनाच्या या नव्या रुपांबद्दल कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. त्याचसोबत युके, साउथ अफ्रिका आणि ब्राझील या देशांनी सुद्धा सरकारला आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नियमावलीत बदल करण्याचे सुचित केले आहे.

दिल्लीतील विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. पण डॉमॅस्टिक प्रवाशांना RT-PCR च्या निगेटिव्ह रिपोर्ट्सची गरज भासणार नाही आहे. पण प्रवाशांना 7 दिवस होम क्वारंटाइन रहावे लागणार आहे. यामध्ये सरकारी अधिकारी आणि स्टाफ यांना सूट दिली गेली आहे. त्याचसोबत दिल्ली विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी सुविधा एन्ट्री गेट 8 वर उपलब्ध करुन दिली गेली आहे.

तर महाराष्ट्रात दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा आणि केरळ येथून येणाऱ्या प्रवाशांनी 72 तासांपूर्वीचे RT-PCR रिपोर्ट स्वत:सोबत घेऊन येणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांनी ही चाचणी केली नसेल त्यांना ती स्वत:च्या पैशाने मुंबई विमानतळावर करावी लागणार आहे. ही चाचणी केल्यानंतरच प्रवाशांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. आरटी-पीसीआरच्या चाचणीसाठी प्रवाशांना 850 रुपये द्यावे लागणार आहेत. त्याचसोबत ज्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह असतील त्यांना पुढच्या प्रवासाठी परवानगी दिली जाणार आहे. पण ज्या प्रवाशांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह येणार त्यांना इंस्टिट्युशन क्वारंटाइनला सामोरे जावे लागणार आहे.

त्याचसोबत सौम्य लक्षणे असलेल्या प्रवाशांना सुद्धा 14 दिवस होम क्वारंटाइन मध्ये रहावे लागणार आहेत. तसेच सात दिवसांमध्ये प्रवास करणाऱ्या किंवा परत येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन होणे गरजेचे नसणार आहे. मात्र त्यांना थर्मल स्क्रिनिंगच्या वेळी तिकिट दाखवावे लागणार आहे.(कोरोना विषाणूविरुद्ध Herd Immunity हे एक Myth आहे; नवीन स्ट्रेन हा अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक असू शकतो- AIIMS Director)

केरळात सुद्धा सर्व प्रवाशांसाठी थर्मल स्क्रिनिंग करणे अत्यावश्यक असणार आहे. ज्यांच्यामध्ये लक्षण दिसून येतील त्यांनाच थर्मल स्क्रिनिंगला सामोरे जावे लागणार आहे. तर डोमॅस्टिक प्रवाशांसाठी 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन रहावे लागणार आहे. त्याचसोबत अगदी मर्यादित कालावधीसाठी येणारे जसे उद्योग, अधिकारी, ट्रेड, मेडिकल, कोर्टामधील प्रकरणांसमधील व्यक्ती यापासून दूर असणार आहेत.