केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज (गुरुवार,14 मे 2020) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजच्या दुसऱ्या टप्प्याबाबत माहिती दिली. हे पॅकेज केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियान (Atma Nirbhar Bharat Abhiyan) अंतर्गत देण्यात आले आहे.केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितले की, सरकार शेतकरी, गरीब आणि मजूर वर्गावर बारीक लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना व्याजदरात 31 मे पर्यंतची सूट देण्यात आली आहे. गरीब आणि छोट्या शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दरात 4 लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, हे सरकार गरीबांसाठी काम करते. गरीब जनतेचा उद्धार हे या सरकारचे मोठे काम आहे. सरकारने 3 कोटी शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. 25 लाख शेतकऱ्यांना क्रेडीट कार्ड देण्यात आले आहे. (हेही वाचा, Atma Nirbhar Bharat Abhiyan: लोकल ब्रांड ग्लोबल करण्यावर विशेष लक्ष्य, नागरिकांच्या खात्यात पैसे थेट जमा; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजबाबत माहिती)
Nirmala Sitharaman: Income Tax Return भरण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ; पाहा सविस्तर - Watch Video
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी बुधवारी पहिली पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजबाबत विस्ताराने माहिती दिली. ठाकुर आणि सीतारमण यांनी आजही पत्रकार परिषद घेऊन या पॅकेजमधील दुसऱ्या टप्प्याबाबत विशेष माहिती दिली.