देशभरात वाढत्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता येत्या 26 मार्चला होणारी राज्यसभा निवडणूक रद्द करण्यात येणार असल्याची निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणूका जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 37 उमेदवार बिनविरोध निवडले गेले होते. पण 18 जागांसाठी येत्या 26 तारखेला निवडणूका होणार होत्या. मात्र कोरोनामुळे निवडणूका स्थगित करण्यात आल्या असून नव्या तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच निवडणूक आयोगाने असे ही म्हटले आहे की, मतदानासाठी सध्याची देशातील परिस्थिती ठिक नाही आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत निवडणूका झाल्यास मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते आणि हे चुकीचे आहे. सध्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये अशी वारंवार सुचना दिली जात आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतला आहे.
राज्यसभेच्या 55 पैकी 18 जागांवर मतदान होणार होते. यामध्ये गुजरात आणि आंध्र प्रदेशातील अनुक्रमे 4-4, राजस्थान आणि मध्य प्रदेशात अनुक्रमे 3-3, झारखंड येथए 2 आणि मणिपुर-मेघालय येथे अनुक्रमे 1-1 जागांवर मतदान पार पडणार होते. राज्यसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि राज्यसभेचे उपसभापति हरिवंश नारायण सिंह यांच्यासह 37 उमेदवार बिनविरोधी निवडले गेले होते.(Coronavirus In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता पुन्हा भारतवासियांना संबोधणार; Covid 19 ला रोखण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींवर दिल्या जाणार सूचना)
Election Commission has deferred the Rajya Sabha Elections that were scheduled to be held on 26th March. https://t.co/lO7oFWtwsJ
— ANI (@ANI) March 24, 2020
देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 446 वर तर महाराष्ट्रात 101 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी देशातील कोरोनाची आणि लॉकडाउनची परिस्थिती गांभीर्याने घ्यावी असे आवाहन सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. तसेच आज रात्री 8 वाजता पुन्हा नरेंद्र मोदी देशातील जनतेला संबोधणार आहेत.