कोरोना व्हायरस हॉट-स्पॉट परिसरावर बारीक नजर ठेवणारे एक ड्रोनच बेपत्ता झाल्याने दिल्ली पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली आहे. हा प्रकार दिल्ली-नोएडा सेक्टर 75 येथे घडला. कोरोना व्हायरस, लॉकडाऊन काळात जमावबंदी, संचारबंदी सुरु असूनही नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यातच अत्यंत दाटीवाटीच्या परिसरात पोलिसांनाही बारकाईने नजर ठेवणे कठीण होत आहे. त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून या परिसरावर नजर ठेवली जात आहे. अशात ही नजर ठेवणारे ड्रोनच गायब झाल्याने पोलिसांवर आता ड्रोन शोधण्याची वेळ आली आहे. ड्रोन गायब होऊन चार ते पाच दिवस उलटून गेले तरीही अद्याप त्याचा शोध लागल नाही.
नोएडा परिसरात ही घटना घडली. पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या शेवटच्या तपशिलानुसार दिल्लीतील एका बांधकाम अवस्थेत असलेल्या सुपरटेक नॉर्थ परिसरात या ड्रोनचे लोकेश ट्रॅक करण्यात आले होते. पोलीस सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, नोएडा सेक्टर 75 येथील सुपरटेक केपटाउन सोसायटी हॉट-स्पॉट म्हणून घोषीत करण्यात आली आहे. चार पाच दिवसांपासून या परिसरात सेक्टर 49 पोलीस ठाण्यातील कर्मचारी नजर ठेऊन आहेत. इथली गरज पाहून पोलिसांनी एका खासगी कंपनीकडून ड्रोन भाड्याने घेतले होते. त्याच्या माध्यमातून ही नजर ठेवली जात होती.
नोएडा सेक्टर 49 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रोन कंपनी ऑपरेटर ने ड्रोनची उंची सुमारे 130 मीटर लॉक करुन ते आकाशात सोडले. काही वेळानंतर ड्रोन व्हिडिओ मिळू लागले. अनेक सोसायटींमधील परिसरा अगती व्यवस्थीत दिसू लागला. मात्र, ड्रोनचा जमीनीवरील संपर्क अचानक तूटला. तो संपर्क पूर्ववत करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्याला यश आले नाही. ड्रोन गायब झाले. (हेही वाचा, Coronavirus:मुंबईतील दाट लोकवस्तीच्या भागात लॉकडाउनच्या आदेशाचे कठोर पालन करण्यासाठी ड्रोन नजर ठेवणार-राजेश टोपे)
पोलिसांनी ड्रोन गायब झाल्याचे ध्यानात येताच लगेच दुसरे ड्रोन हवेत सोडले. आगोदर गायब झालेल्या ड्रोनचा तपास सुरु केला. मात्र, अद्यप त्यालाही यश आले नाही. काही वेळाने एक ड्रोनसदृश्य वस्तू एका इमारतीवर पडलेली दिसली. पोलिसांनी तेथे जाऊन पाहिले तर तिथे काहीच नव्हते. फक्त सिमेंटची पोती होती. जी ड्रोनसारखी दिसत होती.