अण्णा दव्रिड मुनेत्र कझगम (India Anna Dravida Munnetra Kazhagam) पक्षाच्या एका आमदाराची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्याला चेन्नई (Chennai) येथील एमआयओटी आंतरराष्ट्रीय रुग्णालयात (MIOT International Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तमिळनाडू (TamilNadu) राज्यातील एआयए़डीएमके (AIADMK) हा एक प्रभावी राजकीय पक्ष आहे.
दरम्यान, या आधीही तमिळनाडू येथील एका कोरोना व्हायरस संक्रमित आमदाराचा मृत्यू झाला होता. जे. अंबाजगन (J Anbazhagan) असे या आमदाराचे नाव होते. ते द्रविड मुनेत्र कडगम (DMK) आमदार होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली होती. अखेर त्यांचा मृत्यू झाला. चेन्नई येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. बुधवारी सकाळी 7 वाजता त्यांचे निधन झाले. अंबाजगन हे पश्चिमि चेन्नई जिल्ह्यातील डीएमके पक्षाचे सेक्रेटरीही होते. कोरोना व्हायरस संक्रमनामुळे एखाद्या आमदाराचा मृत्यू होण्याची देशातील ही बहुदा पहिलीच घटना होती.
दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांसोबतच आता विविध राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री, पदाधिकाऱ्यांनाही कोरोना व्हायरस संक्रमन होत आहे. या शिवाय विविध राज्यातील पोलीस कर्मचारी-अधिकारी, आरोग्य प्रशासन आणि इतरही विभागातिली कर्मचारी-अधिकाऱ्यांना कोरोना व्हायरस संक्रमन झाल्याचे पुढे आले. त्यामुळे कोरोना व्हायरस संकटाची व्याप्ती अधिकच वाढली आहे. (हेही वाचा, Coronavirus: DMK आमदार Jayaraman Anbazhagan यांचे कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन)
An MLA from All India Anna Dravida Munnetra Kazhagam (AIADMK) has tested positive for #COVID19. He is currently admitted at the hospital: MIOT International Hospital, Chennai #TamilNadu
— ANI (@ANI) June 13, 2020
दरम्यान, देशातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असतानाच केंद्र आणि राज्य सरकारांनी लॉकडाऊन हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात रुग्णांची संख्या कमी होणार की लॉकडाऊन वाढवल्यामुळे अशीच वाढत राहणार याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.