DMK MLA Jayaraman Anbazhagan (Photo Credits: Facebook)

द्रविड मुनेत्र कडगम (DMK) पक्षाचे आमदार जे. अंबाजगन (J Anbazhagan) यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली होती. अखेर त्यांचा मृत्यू झाला. चेन्नई येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. बुधवारी सकाळी 7 वाजता त्यांचे निधन झाले. अंबाजगन हे पश्चिमि चेन्नई जिल्ह्यातील डीएमके पक्षाचे सेक्रेटरीही होते. कोरोना व्हायरस संक्रमनामुळे एखाद्या आमदाराचा मृत्यू होण्याची देशातील ही बहुदा पहिलीच घटना आहे.

अंबाजगन यांना गेल्या मंगळवारपासून श्वसनास त्रास होत होता. तसेच, दम लातक असल्याने व ताप आल्याने अंबाजगन यांची कोरोना व्हायरस चाचणी केली. ती पॉझिटीव्ह आली होती. त्यानंत त्यांना चेन्नई येथील डॉ. रेला इन्स्टिट्यूट अॅण्ड मेडिकल सेंटर येथे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 61 वर्षीय अनबालागन यांना किडणीशी संबंधित आजार होते. त्यांच्या शरीरातील साखरेची पातलीही उच्च होती. (हेही वाचा, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना रुग्णालयातून मिळाली सुट्टी; म्हणाले-'पूर्णपणे ठीक होण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल')

रुग्णालयाचे सीईओ डॉ. इलनकुमार कलियामूर्ति यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार अंबाजगन यांची प्रकृती सोमवारी सांयकाळपासून खालावत गेली. त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले होते. कलियामूर्ती यांनी पुढे सांगितले की, डीएमके आमदार अंबाजगन यांचे हृदयही व्यवस्थित कार्य करत नव्हते. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. अखेर बुधवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.