हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) राज्यातील थोरांग (Thorang) नावाचे संपूर्ण गावच्या गाव कोरोना व्हायरस (Coronavirus) पॉझिटिव्ह झाले आहे. अपवाद म्हणून केवळ एक नागरिक कोरोना निगेटीव्ह निघाला आहे. गावकऱ्यांचे रिपोर्ट पोहून प्रशासनही चक्रावून गेले आहे. हिमाचल प्रदेशमधील लाहौल-स्पिती (Lahaul And Spiti) जिल्ह्यात हा प्रकार पुढे आला आहे. लाहौल-स्पिती हा जिल्हा सर्वाधिक कोरोना बाधितांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आहे. या गावातील काही नागरिकांचा कोरोना व्हायरस रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे परिसरातील आणखी काही नागरिकांची चाचणी करण्यात आली. त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अवघ्या गावाचीच चाचणी करण्यात आली असता अवघे गावच कोरोनाच्या विळख्यात असल्याचे पुढे आले.
टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार कवळ थोरांग गावचा रहीवासी असलेला भूषण ठाकूर नामक 52 वर्षीय व्यक्ती कोरोना निगेटीव्ह आला आहे. अवघं गाव कोरोना व्हायरस संक्रमीत असल्यामुळे सर्वजण क्वारंटाईन झाले आहेत. मात्र, या प्रकारामुळे भूषण ठाकूर हा व्यक्ती क्वारंटाईन असल्याप्रमाणे वागू लागला आहे. आपल्याला गावकऱ्यांमध्ये मिसळता येत नाही. कोणाची मदत घेता येत नाही, अशी विचित्र अवस्था या नागरिकाची झाली आहे.
दरम्यान, लाहौल-स्पिती जिल्ह्यात राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पर्यनावर बंदी घालण्यात आली आहे. हा जिल्हा नदी, खोरे आणि टेकड्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. दुसऱ्या बाजूला थोरांग गावही क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे गावातील कोणत्याही व्यक्तीस गावाबाहेर जाण्यास आणि गावाबाहेरी कोणत्याही व्यक्तीस गावात येण्यास मनाई आहे. (हेही वाचा, Coronavirus: मुंबई-दिल्ली विमान, रेल्वे सेवा पुन्हा एकदा बंद होण्याची शक्यता, प्रस्ताव विचाराधीन असल्याची चर्चा)
धक्कादायक म्हणजे थोरांग गावाची सध्याची लोकसंख्याच मुळात केवळ 42 इतकी असल्याचे सांगितले जाते. हिवाळ्याच्या दिवसात या गावातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने या गावातील अनेक नागरिक कुलूला येथे स्थलांतरीत झाले आहेत. दरम्यान, या दिवसात पर्यटकांचीही मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. परंतू, 42 पैकी 41 नागरिक कोरोना व्हायरस संक्रमित आले आहेत. त्यामुळे सर्वच गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.