काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक पुन्हा एकदा रद्द, CWC ने कोरोनाच्या कारणामुळे घेतला निर्णय
Congress President Sonia Gandhi (Photo Credits: ANI)

दिल्लीत आज काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या कार्यसमितीची बैठक पार पडली. बैठकीक पक्षाच्या अध्यक्ष पदासाठीच्या निवडणूकी संदर्भातील तारीख जाहीर केली होती. 23 जून रोजी निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही निवडणूक रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.तर अशोक गहलोत यांनी कोरोनाची गंभीर परिस्थितीचा हवाला देत असे म्हटले की, अशा स्थितीत सध्या निवडणूक घेणे योग्य नाही. गहलोत यांच्या या बोलण्याचे गुलाम नबी आजाद, आनंद शर्मा यांनी समर्थन केले.

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देशातील कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात सखोल चर्चा झाली. या व्यतिरिक्त नुकत्याच चार राज्य आणि एका केंद्र शासित प्रदेशातील निवडणूकीच्या निकालासंदर्भात सुद्धा विचार करण्यात आला आणि रणनिती ठरवण्यात आली.बैठकीत असे ही म्हटले की, गेल्या चार आठवड्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. तर सरकार सातत्याने अयशस्वी होत आहे. सोनिया गांधी यांनी वैज्ञैनिकांचा सल्ला पूर्णपणे नाकारला आणि देशात मोदी सरकारच्या चुकीमुळे मोठी किंमत मोजावी लागत असल्याचे म्हणत केंद्रावर निशाणा साधला.(Sonia Gandhi In CWC: काँग्रेस पक्षात मोठ्या सुधारणांची गरज- सोनिया गांधी)

आंतरराष्ट्रीय स्तरावरुन ही आपल्याला मदतीचा हात पुढे केला जात आहे, त्यामुळे काँग्रेसकडून सर्व देशांसह संस्थांना धन्यवाद असे सोनिया गांधी यांनी म्हटले. या व्यतिरिक्त सोनिया गांधी यांनी जेव्हा आपण सर्वजण कोविड19 च्या स्थितीत व्यस्त आहोत. पण ही बैठक निवडणूकींच्या निकालासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आली आहे. सोनिया गांधी यांनी बैठकीत असे ही म्हटले की, निवडणूकीत झालेल्या पराभावामुळे नाराज आहे. याच निवडणूकीच्या निकालावर मंथन करण्यासाठी एक लहान ग्रुप तयार करण्यावर जोर देत आहे. अशी अपेक्षा आहे की, लवकरच एका नव्या रिपोटसह आपण पुन्हा एकदा बैठक करु.

दरम्यान, केरळ आणि आसाम मध्ये आपण का पराभूत झाले आणि पश्चिम बंगालमध्ये आपल्याला एकही जागेवर विजय का मिळवता आला नाही हे आपल्याला समजून घेणे आवश्यत आहे. तर आपण जर वास्तविकता पाहिली नाही तर त्यामधून शिकणार कसे. तसेच 22 जानेवारील आपण जेव्हा भेटलो तेव्हा निर्णय घेण्यात आला होता की,  जूनच्या अखेर पर्यंत काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठीच्या निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण होईल.