Congress Party | Photo Credit - Twitter

काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या धावपळीत बैठकांचा जोरदार धडाका सुरु आहेत. दुसऱ्या बाजूला अध्यक्ष पदाचे दावेदार मानले जाणारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे अनेक दावे प्रतिदावे सुरु असताना अध्यक्ष पदाची निवडणूक शशि थरुर (Shashi Tharoor) आणि दिग्विजय सिंह (Digvijay Singh) या दोन नेत्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. अर्थात पवनकुमार बन्सल यांचेही नाव यादीत आहे. परंतू, शशि थरुर यांनी दिग्वीजय सिंह यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर या दोन्ही नेत्यांमध्येच लढत होण्याची चर्चा आहे.

शशि थरूर यांनी आपल्या ट्विटह हँडलवर एक छायाचित्र शेअर केले आहे. ज्यामध्ये दोन्ही नेते एकमेकांना मिठी मारताना दिसतात. सोबत त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ही प्रतिस्पर्ध्यांमधील लढाई नाही तर सहकाऱ्यांमधील मैत्रीपूर्ण लढत आहे. काँग्रेसला विजय मिळवून देणे हेच आमचे समान ध्येय असल्याचे त्यांनी ट्वटर पोस्टमध्ये नमूद केले आहे. ()

शशि थरुर यांची पोस्ट रिट्विट करताना दिग्वीजय सिंह म्हणाले की ते थरूर यांच्याशी सहमत आहेत. त्यांनी जोर दिला की त्यांची लढाई "सांप्रदायिक शक्तींविरुद्ध" आहे आणि ते दोघेही गांधीवादी-नेहरूवादी विचारसरणीवर विश्वास ठेवतात. त्यांनी थरूर यांना आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या.

राजस्थानमध्ये आमदारांच्या बंडखोरीनंतर काँग्रेसचे दिग्गज नेचे अशोक गेहलोत काँग्रेसच्या सर्वोच्च पदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. त्यानंतर शशि थरूर आणि दिग्विजय सिंह हे या पदासाठी प्रमुख दावेदार आहेत. या निवडणुकीसाठी दोन्ही नेते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. थरूर यांनी गेल्या आठवड्यात उमेदवारी अर्ज घेतला तर दिग्विजय सिंह यांनी आज. (हेही वाचा, Congress Party President Elections: अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून बाहेर, स्वत:च केली घोषणा)

राज्यसभा खासदार आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे गांधी घराण्याचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. दुसरीकडे शशि थरूर, कॉंग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांमध्ये होते. जे आता G-23 म्हणून ओळखले जाताक, ज्यांनी 2020 मध्ये कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात व्यापक सुधारणांची मागणी केली होती.