Ashok Gehlot | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राजस्थानचे (Rajasthan ) मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी आपण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक (Congress president's election) लढवणार नसल्याचे गुरुवारी (29 सप्टेंबर) जाहीर केले. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आणि राज्यात त्यांच्या उत्तराधिकारी नियुक्तीवरून पक्षांतर्गत मोठा संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अशोक गहलोत यांनी काँग्रेसच्या (Congress) अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी ( Sonia Gandhi ) यांची त्यांच्या निवासस्थानी नवी दिल्ली (New Delhi) येथे भेट घेतली त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.

अशोक गहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. दोन दिवसांपूर्वी जे काही घडले त्याने आम्हाला धक्का बसला. मला मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून हे सर्व घडले असा संदेश यातून देण्यात आला. परंतू, त्यात फारसे तथ्य नाही. घडल्या प्रकाराबद्दल मी पक्षाध्यक्षांची माफी मागितली, असे गेहलोत यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांना सांगितले.

ट्विट

पुढे बोलताना अशोक गहलोथ म्हणाले, मी कोचीमध्ये राहुल गांधींना भेटलो आणि त्यांना निवडणूक लढवण्याची विनंती केली. त्यांनी ते मान्य केले नाही. आपण काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार नाही यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मी त्यांना अध्यक्ष पदाची निवडणूक लढविणयास तयार असल्याचे सांगितले. पण आता त्या घटनेमुळे (राजस्थानमधील) मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वातावरणात मी नैतिकतेच्या मुद्द्यावर लढवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

ट्विट

गहलोत यांना प्रसारमाध्यमांनी लगेचच विचारले की, यापुढेही आपण राजस्थानचे मुख्यमंत्री राहणार आहात का? यावर गेहलोत म्हणाले की, ते मी ठरवणार नाही, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हे ठरवतील. विशेष म्हणजे, गेहलोत यांच्या भेटीनंतर राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट सोनिया गांधी यांना नंतर भेटणार आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.