Priyanka Gandhi Prays: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची Karnataka Results दिवशी मंदिरात प्रार्थना (Watch Video)
Priyanka Gandhi Vadra (Photo Credit - Twitter)

Karnataka Assembly Election Results 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 चा निकाल आज (13 मे) घोषीत होतो आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांचा एक व्हिडिओ अनेकांचे लक्ष वेधून घेतो आहे. या प्रियंका गांधी वड्रा या सिमला येथील जाखू परिसरातील हनुमान मंदिरात (Hanuman temple in Shimla) प्रार्थना करताना दिसत आहे. देश आणि कर्नाटक राज्यातील नागरिकांच्या शांतता आणि समृद्धीसाठी त्या प्रार्थना करत होत्या, असे एका काँग्रेस नेत्याने म्हटले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि जेडी (एस) यांच्यात जोरदार टक्क पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर असून, काँग्रेस काहीसे आघाडीवर दिसत आहे. काँग्रेसने सकाळी मतदान सुरु झाल्यापासून भाजपवर वीस ते पंचवीस जागांनी आघाडी घेतली आहे. इतर ठिकाणी काट्याची टक्कर सुरु आहे.

कर्नाटक राज्यातील निवडणूक निकालाच्या प्राथमिक कल पाहिले तर काँग्रेसने अगदी सुरुवातीच्या आघाडीवर आघाडी घेतली आणि अवघ्या तासाभरात काँग्रेसने अर्धा टप्पा पार केला. आत्मविश्वासाने भरलेल्या काँग्रेसने ट्विट केले आहे की, "मी अजिंक्य आहे. मला खूप आत्मविश्वास आहे. होय, मी आज थांबू शकत नाही." दुसऱ्या बाजूला 224 सदस्यीय विधानसभेत पक्षाला 130 हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला. कर्नाटक विधानसभा मतदानानंतर आलेल्या 10 पैकी दोन एक्झिट पोलने कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. सात एक्झिट पोल्सनी राज्य त्रिशंकू विधानसभेच्या दिशेने जात असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, Karnataka Election Results 2023: दिल्ली पाठोपाठात कर्नाटकात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सुरू केलं सेलिब्रेशन; सुरूवातीच्या कलांमधील आघाडीने पक्षात चैतन्याचे वातवरण (Watch Video))

ट्विट

दरम्यान, वरुणा, कनकापुरा, शिगगाव, हुबळी-दारवाड, चन्नापटना, शिकारीपुरा, चित्तापूर, रामनगरा आणि चिकमंगळूर हे निकालाच्या दिवशी लक्ष ठेवण्यासारखे महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील निकाल विधानसभा निवडणुकीच्या अंतिम निकालावर चांगलेच प्रभाव टाकू शकतात. तसेच, राज्यातील 17 आणि 11 टक्के लोकसंख्या असलेले लिंगायत आणि वोक्कलिगा समुदाय देखील अंतिम मतदानाचा निकाल ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.