केंद्रीय अर्थसंकल्प आढावा बैठकीस खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनाच निमंत्रण नाही: पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan | ( Photo Credits: Twitter/ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भाजप (BJP) प्रणीत केंद्रातील एनडीए (NDA) सरकार लवकरच आपला अर्थसंकल्प (Union Budget 2020) संसदेच्या पटलावर मांडणार आहे. त्या आधी अर्थसंकल्पपूर्व आढावा बैठकांचा धडाका केंद्र सरकारने लावला आहे. मात्र, या बैठकांना दस्तुरखुद्द केंद्रीय अर्थमंत्री ((Finance Minister) निर्मला सीतारमण ( Nirmala Sitharaman) यांनाच निमंत्रण दिले जात नसल्याच आणि त्यांना या बैठकांतून वगळण्यात आल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी (22 जानेवारी 2020) केला आहे.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या कामगिरीवर खूश नसतील तर त्यांनी सीतारमण यांचा राजीनामा घ्यावा. पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसेच, दिल्लीतील संसदीय कामाचाही चव्हाण यांना चांगला अनुभव आहे. ते दिल्लीच्या राजकारणातही प्रदीर्घ काळ होते. त्यामुळे चव्हाण यांचे विधान अधिक गांभीर्याने घेतले जात आहे. (हेही वाचा, ..तर भाजप आणि देवेंद्र फडणीस यांच्या सहकाऱ्यांवर मुखवटे खाजवण्याची वेळ येणार नाही: शिवसेना)

पीटीआय ट्विट

दरम्यान, येत्या 1 फेब्रुवारी या दिवशी केंद्रातील मोदी सरकार आर्थीक वर्ष 2020-2021 चा अर्थसंकल्प सादर करणार आहे. सरकार कोणतेही असलेल तरी अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर ठेवण्यापूर्वी आढावा बैठका घेतल्या जातात. या बैठका आणि अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या निगराणी आणि मार्गदर्शनाखाली पार पडतात.