Former Chief Minister Devendra | (Photo Credits: Twitter/ANI)

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेने 2014 मध्येच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसोबत संपर्क साधला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केल्यावर भाजपच्या हातात चांगलेच कोलीत मिळाले. त्यानुसार भाजपने शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडत 'शिवसेनेचा खरा चेहरा पुढे आला' असे म्हटले. भाजपच्या या टीकेला शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना संपादकीयातून (Saamana Editorial) जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत. बोलायचे एक व करायचे दुसरेच हे 2019 सालीही झाले. याचे दृश्य फळ म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला व गुरुमहारांजांनी प्रयत्न केले तरी, शरद पवार यांनी भाजपशी कुरघोडी होऊ दिली नाही. अर्थात सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव फेटाळला नाही. याचा अभ्यास भाजप (BJP), फडणवीस (Devendra Fadnavis) व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला तर, स्वत:च्याच चेहऱ्यावरील मुखवटे खाजवत बसण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही, असे सामनात म्हटले आहे.

काय म्हटले आहे सामनामध्ये? (जसेच्या तसे)

  • शिवसेनेचा खरा चेहरा कोणता यावर महाराष्ट्र भाजपने संशोधन सुरु केले आहे. संशोधन म्हणण्यापेक्षा पुराततत्व विभागाचे उत्खनन म्हणने सोयीचे ठरेल. 2014 मध्ये शिवसेनेने काँघ्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिल्याचा स्फोट कांग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्या आधारे हे उत्खनन सुरु झाले आहे. चव्हाण यांचे म्हणने असे की, 2014 साली विशिष्टराजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी आघाडी स्थापन करण्याचा शिवसेनेचा विचार होता. त्यादृष्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँघ्रेसने आपल्याशी संपर्क साधला होता. अपण तो प्रस्ताव फेटाळला. चव्हाण यांच्या या दाव्याने फारशी खळखल किंवा खळबळ होण्याचे कारण नव्हते. चव्हाणांचा दावा मुंबईतील सौम्य थंड हवेत वाहून गेला. शिवसेनेने किंवा राष्ट्रवादीने यावर गांभीर्याने मत व्यक्त केल्याचे दिसत नाही. पण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा दावा इतका गांभीर्याने घेतला की, दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत विझलेली चिलीम फुंकण्याचा प्रयत्न करीत होते. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बाहेर उभे राहून त्यांनी सांगितले की, हे अत्यंत आश्चर्यकारक आहे व पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असून, त्यामुळे शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला आहे.
  • चव्हाण काय बोलले त्यात आम्हाला पडायचे नाही. पण या निमित्ताने भाजप आपला चेहरा स्वत:च ओरबाडीत आहे. खरेतर 2014 साली भाजपचा खरा चेहरा उघड झाला व तो संपूर्ण देशाने पाहिला. पृथ्वीराज चव्हाण जे सांगतात त्यात लॉजिक नावाचा प्रकार अजिबात नाही. हे आधी मान्य केले पाहिजे. 2014 साली हिंदुत्त्व, हिंदू मतांचे विभाजन आणि 25 वर्षांचे नाते यांचा विचार न करता अत्यंत निर्घृण पद्धतीने भाजपने शिवसेनेशी युती तोडली. त्याचे हिंदुत्त्व वैगेरे ढोंग ठरले. हा भाजपचा पहिला मुखवटा उतरला. पण, त्यानंतरही खरा चेहरा बाहेर आला नाही. कारण एका मुखवट्यावर त्यांचे भागत नाही. 2014 सालात भाजप-शिवसेना वेगळे लढले तसे काँघ्रेस-राष्ट्रवादी वेगळे लढले. चौरंगी लढतीत भाजप 122 जागा जिंकून मोठा पक्ष ठरला. शिवसेनेने स्वबळावर 63 जागा घेतल्या. काँग्रेस 42 जागा तर राष्ट्रवादी 41 जागांवर थांबले. म्हणजेच विधानसभा त्रिशंकूच ठरकली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा दारुण पराभव झाला. व सत्ताधारी काँघ्रेस थेट तिसऱ्या स्थानावर फेकली गेली. त्यामुळे काँघ्रेसला त्यावेळी आवाज नव्हता. चव्हाण यांच्याकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. शइवसेना विरोधी पक्षात बसण्याच्या मानसिकतेत होती. व भाजप पुन्हा हिंदुत्त्व वैगेरे नात्यांची जाळी फेकू लागला होता. सरकार स्थापनेचे घोंगडे लटकलेच होते. असे म्हणायला हरकत नाही. 2014 साली हे नाट्य घडत असताना शिवसेनेने चेहरा लपवलेला नव्हता. शिवसेना उजळ माथ्याने वावरत होती. (हेही वाचा, भाजपाला इंदिरा गांधी प्रिय झाल्याचा सर्वात जास्त आनंद: शिवसेना)

मुखवट्याचे कारखाने भाजपकडेच होते. लॉजिक म्हमाल तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने आजच्याप्रमाणए एकत्र यावे असे जबरदस्तीनेठरवले असतेत तरी आकडा जमत नव्हता. मारुन मुटकून 149 चा आकडा होता वत तो धोकादायक होता. ते काठावरचे बहुमत होते. व घडेाजारात मशहूर असलेले भजपवाले साम-दाम-दंड भेद नीतीचा वापर करुन तोडफोड करायला तयार होते. फडणवीस यांनी आणखी एक गोष्ट जमजून घेतली पाहिजे. 2014 साली राष्ट्रवादीने भाजपला उघड पाठिंबा दिला व त्यामागे गुरुमहारांजांची इच्छा व दिशा होती. हे सत्य स्वीकारले तर शिवसेच्या चेहऱ्यावर ओरखडे मारण्यापेक्षा भाजपने स्वत:चा खरा चेहरा आरशात पाहणे गरजेचे आहे. 2014 सालचीच शिवसेना आजही आहे. भाजपला 105 असूनही विरोधी बाकांवर पसण्याची वेळ आली. कारण भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत. बोलायचे एक व करायचे दुसरेच. हे 2019 सालीही झाले. त्याचे दृश्य फळ म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला व गुरुमहारांजांनी प्रयत्न केले. तरी शरद पवारांनी भाजपची कुरघोडी या वेळी होऊ दिली नाही. अर्थात सोनिया गांधी यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव फेटाळला नाही. 2014 साली अशा प्रस्तावांना कागदाच्या चुरगळलेल्या कपट्याचीही किंमत नव्हती. याचा अभ्यास फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला तर स्वत:च्या चेहऱ्यावरील मुखवटे खाजवत बसण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही.