Surprise | Representative image (Photo Credit- Pixabay)

सरकारी योजनेच्या माध्यमांतून विवाहाची भेट (Wedding Kit) म्हणून देण्यात येणाऱ्या किटमध्ये चक्क कंडोम (Condoms) आणि गर्भनिरोधक गोळ्यांची (Contraceptive Pills) पाकिटे वाटण्यात आली आहेत. ही घटना मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील झाबुआ जिल्ह्यात झालेल्या सामूहिक सोहळ्यात घडली. राज्य सरकारच्या वतीने विवाहावेळी नववधूंना मेक-अप-बॉक्स वाटण्यात आली. या वेळी अनेक नववधूंच्या किटमध्ये चक्क गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोंमची पाकिटे आढळून आली. ही पाकिटे सरकारी योजनांचाच भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

मध्यप्रदेश राज्यातील झाबुआ जिल्ह्यातील थंडाला येथे आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोळल्यात तब्बल 296 जोडपी विवाहबद्ध झाली. या वेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मुख्यमंत्री कन्या विवाह/निकाह योजना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठीच्या योजनेअंतर्गत मेकअप किटचे वाटप करण्यात आले. या वेळी ही पाकिटे मेक-अप बॉक्समध्ये सापडली जी योजनेचा भाग म्हणून जोडप्यांमध्ये वाटली गेली. (हेही वाचा, Extramarital Affairs: हमे कोई गम नही! विवाहित लोकांना जोडीदाराची फसवणूक केल्यानंतर पश्चात्ताप होत नाही; अभ्यासात धक्कादायक खुलासा)

वरिष्ठ जिल्हा अधिकारी भुरसिंग रावत यांनी माहिती देताना म्हटले की, राज्याच्या आरोग्य विभागावने, कुटुंब नियोजनाशी संबंधित जनजागृती कार्यक्रमाचा भाग म्हणून आरोग्य अधिकार्‍यांनी कंडोम आणि गर्भनिरोधकांचे वाटप केले असावे. वरिष्ठ जिल्हा अधिकारी असलेले भुरसिंग रावत यांनी पुढे म्हटले की, कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या वाटण्यासाठी आम्ही जबाबदार नाही. हे शक्य आहे की आरोग्य विभागाने हे साहित्य त्यांच्या कुटुंब नियोजन जागृती कार्यक्रमाचा भाग म्हणून दिले असावे. मुख्यमंत्री कन्या विवाह/निकाह योजनेंतर्गत, आम्ही थेट ₹ 49,000 हस्तांतरित करतो. लाभार्थ्यांचे बँक खाते. आम्ही अन्न, पाणी आणि विवाहासाठी तंबू पुरवण्यासाठी जबाबदार आहोत, ज्याची रक्कम ₹ 6,000 आहे. वाटल्या गेलेल्या पॅकेटमध्ये काय आहे याची मला कल्पना नव्हती, असेही रावत म्हणाले.

दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी एप्रिल 2006 मध्ये मुख्यमंत्री कन्या विवाह/निकाह योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, सरकार वधूच्या कुटुंबाला ₹ 55,000 प्रदान करते.