CM Ashok Gehlot Health Update: अशोक गहलोत यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, आराम करण्याचा डॉक्टरांनी दिला सल्ला
Rajasthan CM Ashok Gehlot (Photo Credits: IANS)

CM Ashok Gehlot Health:  राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची अँजयोप्लास्टी झाल्याच्या दोन दिवसानंतर त्यांना आज डिस्चार्ज दिला गेला आहे. गहलोत हे सवाई मान सिंह रुग्णालयात दाखल झाले होते. तर आता डिस्चार्ज दिल्यानंतर अशोक गहलोत यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला आहे. गहलोत यांनी घरी आल्यावर आपल्या प्रकृती बद्दल एक ट्विट सुद्धा केले आहे.(देशातील 9 राज्यात आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांची संघर्षगाथा दाखवणाऱ्या संग्रहालयाचे काम सुरु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य)

अशोक गहलोत यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, मी व्यवस्थित माझ्या घरी पोहचलो आहे. तर सवाई मान सिंह रुग्णालयाती सर्व डॉक्टर्स, नर्स, वॉर्ड बॉय आणि सफाई कर्मचाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांना धन्यवाद देतो. या लोकांनी माझी उत्तम काळजी घेतली. मुख्यमंत्र्यांनी पुढे असे ही म्हटले की, मी पाहिले सवाई मान सिंह रुग्णालयातील सर्व रुग्णांची अगदी व्यवस्थित सेवा करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी रुग्णालयाची प्रशंसा करावीशी वाटते.(PM Modi Mann ki Baat Updates : खेळांमध्ये युवकांची कामगिरी म्हणजे मेजर ध्यानचंद यांना खरी श्रद्धांजली- पंतप्रधान नरेंद्र मोदी)

Tweet:

तर गहलोत यांना शुक्रवारी सवाई मान सिंह रुग्णालयात अँजियोप्लास्टीसाठी दाखल करण्यात आले होते. तर अवघ्या दोन दिवसातच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला गेला आहे. तर रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी सुद्धा गहलोत यांनी ट्विट करत प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. त्याचसोबत मी लवकरच बरा होऊन घरी येईन. तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. त्याचसोबत मोदी यांच्यासह अन्य राजकीय मंडळींनी गहलोत यांच्या प्रकृतीबद्दल ट्विट केले होते.