Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसचे (Coronavirus) देशावरील महासंकट दूर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान, अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचारी आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. तर सध्या कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे ही एक गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांना लॉकडाउनच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे. गेल्या 24 तासात सीआयएसएफ मधील आणखी 13 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत सीआयएसएफ मधील एकूण 48 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे.

देशाची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन नुसार विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार विविध राज्याीतल कोरोनाची परिस्थिती पाहून लॉकडाउनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या 17 मे पर्यंत देशभरात रेल्वे सेवा सुद्धा पू्र्णपणे बंद राहणार असल्याची सुचना जाहिर करण्यात आली आहे. मात्र आता लॉकडाउनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या कामगार, मजूर, विद्यार्थी आणि अन्य नागरिकांना आपल्या जिल्ह्यात परत पाठवण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.(दिल्ली, मुंबईत आपले कर्तव्य बजावणाऱ्या CISF च्या एकूण 35 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह)

दरम्यान, शुक्रवारी सीआयएसएफ मधील 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामधील 11 जण हे मुंबईत विमानतळ, 11 जण दिल्ली मेट्रो आणि 3 जण दिल्ली विमानतळासह मुंबईतील पोर्ट येथे 2 जण कार्यरत होते. या सर्व जणांना कोरोनाची लागण झाल्याचा माहिती सीआयएसफकडून देण्यात आली आहे. गुरुवारी सीआयएसफ मधील मुंबई विमानतळावर कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.