दिल्ली, मुंबईत आपले कर्तव्य बजावणाऱ्या CISF च्या एकूण 35 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह
CSIF (Photo Credits-ANI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. तर भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे नवे 3390 रुग्ण आणि 1273 जणांची प्रकृती सुधारली आहे. देशात सध्या कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 37,916 ऐवढी असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचारी आपले कर्तव्य अहोरात्र बजावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता तरी कोरोनाची परिस्थिती गांभीर्याने घ्यावी अशी अपेक्षा केली जात आहे. याच दरम्यान दिल्ली, मुंबईत कार्यरत असलेल्या सीआयएसएफच्या एकूण 35 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

सीआयएसएफ मधील 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामधील 11 जण हे मुंबईत विमानतळ, 11 जण दिल्ली मेट्रो आणि 3 जण दिल्ली विमानतळासह मुंबईतील पोर्ट येथे 2 जण कार्यरत होते. या सर्व जणांना कोरोनाची लागण झाल्याचा माहिती सीआयएसफकडून देण्यात आली आहे. गुरुवारी सीआयएसफ मधील मुंबई विमानतळावर कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.(Vande Bharat Mission: लॉकडाउनमुळे अबूधाबीला अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे पहिले विमान कोचीला उतरले)

दरम्यान, देशातील विविध राज्यात लॉकडाउनमुळे स्थलांतरित कामगार आणि मजूर मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. तर केंद्र सरकारने आता या कामगारांना आपल्या घरी पाठवण्यासाठी श्रमिल स्पेशल ट्रेनची सोय करुन दिली आहे. आता पर्यंत 222 श्रमिक स्पेशल ट्रेन धावल्या असून 2.5 लाख जणांचा याचा लाभ घेता आला आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 18 हजारांच्या पार गेला आहे. तर मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनासंबंधित सर्वोतोपरी प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.