Chirag Paswan | (Photo Credits: Facebook)

माजी केंद्रीय मंत्री दिवंगत रामविलास पासवान यांच्या राजधानीतील बंगला '12 जनपथ' मधून बेदखल करणयात आल्यानंतर लोकसभा खासदार चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चिराग पासवान हे रामविलास पासवान यांचे चिरंजवी आहेत. जी गोष्ट सरकारी आहे तिचा मोह ठेवणे हे चुकीचे आहे. मला रामविलास पासवान यांचे घर राहण्यासाठी मिळाले याबाबत मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या घरातून माझ्या वडीलांनी राजकारणातील प्रदीर्घ काळ लढा दिला. त्यामुळे ती जागा सामाजिक न्यायाची जन्मभूमी राहिली आहे. याच घरात राऊन वडीलांनी पक्षस्थापन केला होता. त्याच घरात उचवर्णीय गरीब होते. त्यांनाही आरक्षण देण्याचा विचार मांडण्यात आला.

चिराग पासवान यांनी म्हटले आहे की, घर काढून घेतल्याबद्दल मला काहीच अडचण नाही. आज ना उद्या मला हे घर खाली करायचेच होते. परंतू, ज्या पद्धतीने हे घर खाली केले. त्या पद्धतीबद्दल मला आक्षेप आहे. घर खाली करताना माझ्या वडीलांची प्रतिमा खाली फेकण्यात आली. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात महापुरुषांच्या प्रतिमा लावल्या होत्या. त्या रस्त्यावर फेकण्यात आल्या. त्याबद्दल मला आक्षेप आहे. (हेही वाचा, Chirag Paswan: चिराग पासवान यांनी काय कमावले? स्वत:ची नाव तर बुडवलीच, नीतीश कुमार यांच्याही जहाजाला तडे घालवले, भाजप हनुमानाला गिफ्ट देणार का?)

माझ्यासोबत विश्वासघात झाला आहे. कारण, मी 29 तारखेला रात्री घर खाली करण्यासाठई तयार होतो. परंतू, मला माहिती नाही कारण मला बोलावून माझ्याशी संवाद का साधण्यात आला. केंद्रीय मंत्र्याकडून मला फोन का आला? मला का थांबविण्यात आले? हा एक वेगळा राजकारणाचा मुद्दा आहे. मुकेश सहानी यांच्याबद्दलही बिहारमध्ये जे झाले ते अत्यंत वाईट आणि दु:खद झाले. भाजपसोबत त्यांच्या जाण्याबाबत विचारले असता ते म्हणाले पाठीमागील अडीच वर्षांपासून मी एकटाच चाललो आहे.

दरम्यान, चिराग पासवान यांना आता पुढे काय असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला असता, मी जे करत होते तेच पुढे करेण. आता मला तर माझ्या घरातूनही बाहेर काढण्यात आले. सर्वांचा विचार हाच असतो की चिरागला विस्थापीत करायचा आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो की, मी सिंहाचा मुलगा आहे. रामविलास पासवान यांचा मुलगा आहे. या स्थितीत मी घाबरणार नाही. ना घाबरणार नाही. मला वडीलांची स्वप्न सत्यात उतरवायचे आहे. बिहारला विकसीत बनविण्याचा माझा संकल्प आहे. त्यासाठीच मी काम करत राहीन.