BIPIN Rawat| Photo Credits: Twitter

भारतीय संरक्षण दलात सर्वोच्च स्थानी असलेले सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी (CDS Gen Bipin Rawat)आता पुढील वर्षभरासाठी आपल्या पगारातून 50 हजार रूपये दरमहा PM CARES fund मध्ये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान हा निर्णय कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2020 पासून बिपीन रावत यांनी पत्र लिहून त्यांच्या पगारातील विशिष्ट रक्कम नियमित दान करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार, एप्रिल महिन्यापासून त्यांच्या वेतनातून रक्कम कापली जात आहे.

दरम्यान भारतीय संरक्षण दलातील इतर कर्मचारी आणि अधिकार्‍यांचाही महिन्यातील एका दिवसाचा पगार हा कोरोना व्हायरस संकटाशी लढणार्‍या व्यवस्थेला मदत म्हणून तयार करण्यात आलेल्या पीएम केअर फंडमध्ये जमा करण्यास सुरूवात झाली आहे. हा निर्णय स्वेच्छेने घेण्याचा आहे. मात्र बिपीन रावत यांच्यामाध्यमातून इतर उच्च पदस्थ अधिकार्‍यांचाही यामध्ये भविष्यात समावेश होण्याची शक्यता आहे.

ANI Tweet

नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी मेंबर आणि माजी कोस्ट गार्ड चीफ राजेंद्र सिंह यांनी यापूर्वीच 30% वेतन हे पीएम केअर फंडला दान करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सीडीएस बिपीन रावत देखील सैन्य दलामध्ये आघाडीवर राहून काम करत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या अनेक बैठकींना त्यांची उपस्थिती होती. नरेला क्वारंटाईन सेंटर आणि अन्य सुविधा केंद्रांची त्यांनी स्वतः जातीने जाऊन पाहणी केली आहे.