Engineer Swept Away by Ganga River: भागलपूर (Bhagalpur) च्या नौगाछिया येथील इस्माइलपूर बिंदटोलीच्या कोसळलेल्या बंधाऱ्याची पाहणी करत असताना शनिवारी कटिहारचे मुख्य अभियंता (Chief Engineer) पुरात वाहून गेले. अन्वर जमील असं या मुख्य अभियंत्याचं नाव आहे. कटिहार फ्लड फायटिंग डिव्हिजनचे मुख्य अभियंता अन्वर जमील कोसळलेल्या बंधाऱ्याची पाहणी करत असताना गंगा नदी (Ganga River) च्या जोरदार प्रवाहात ते वाहून गेले. मात्र, एनडीआरएफच्या पथकाने त्यांना तातडीने वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुख्य अभियंता अन्वर जमील हे एनडीआरएफच्या टीमसोबत बोटीवर पाहणी करण्यासाठी आले होते. मात्र एनडीआरएफ बोटीचा वेग वाढल्याने मुख्य अभियंत्याचा तोल गेला आणि ते गंगा नदीत पडले. या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. यानंतर तेथे उपस्थित असलेल्या एनडीआरएफच्या पथकाने तात्काळ बचावकार्य करत मुख्य अभियंत्याचे प्राण वाचवले. (हेही वाचा -Uttarakhand मध्ये सुरू असलेल्या पावसामुळे Alaknanda River च्या पाणी पातळीत प्रचंड वाढ (Watch Video))
लाइफ जॅकेटमुळे वाचले मुख्य अभियंत्याचे प्राण, पहा व्हिडिओ -
Bihar: While inspecting a collapsed embankment in Bhagalpur, Katihar's Chief Engineer was swept away by the Ganga River. The SDRF team quickly rescued him, and he is safe pic.twitter.com/3sFj7bJRIE
— IANS (@ians_india) August 24, 2024
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य अभियंता पाण्यात पडल्यानंतर त्यांना पोहता येत नव्हते, मात्र त्यांनी लाईफ जॅकेट घातले होते, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. (हेही वाचा - (हेही वाचा:Flood in Bangladesh: बांगलादेशातील पुरामुळे 13 लोकांचा मृत्यू, 40 लाखांहून अधिक लोक प्रभावित )
दरम्यान, मुख्य अभियंता अन्वर जमील यांनी सांगितले की, बिंदटोलीजवळील स्पेअर क्रमांकाची झीज पडण्याच्या अवस्थेत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही याची पाहणी करण्यासाठी तिकडे गेलो. परंतु, स्पेअरसमोर जोरदार प्रवाह असल्याने बोटीने तिकडे वळण्याचा प्रयत्न केला असता मी नदीच्या मध्यभागी पडलो. एनडीआरएफच्या टीमने मला वाचवले.