Chhattisgarh: फोन लपवल्याने मुलीने केली वडीलांची हत्या, आईच्या मदतीने अंगणात पुरला मृतदेह
Siblings Murder In Jalgaon | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Chhattisgarh:  मंगळवारी 26 जानेवारीला 58 वर्षीय व्यक्तीची त्याच्या मुलीने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर मुलीचा फोन वडिलांनी लपवल्यानंतर तिला परत देण्यास नकार दिल्याने तिने त्यांना ठार मारले. ही घटना छत्तीसगढ मधील बिलासपुर जिल्ह्यात झाली आहे. 28 वर्षीय आरोपी दिव्या सरस्वतीने आपल्या आईच्या मदतीने घराच्या अंगणातच वडीलांचा मृतदेह पुरला. बेलगहना पोलीस स्थानकाचे प्रभारी दिनेश चंद्र यांनी असे म्हटले की, ही घटना बेलगहना जिल्ह्यातील कंचनपुर गावात झाली आहे. या प्रकरणी मुलगी आणि आईला अटक करण्यात आली आहे. 23 जानेवारीला सरस्वती हिच्या नवऱ्याने तिला तिच्या आई-वडिलांकडे सोडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला तिचा मोबाईल मिळाला नाही. त्यामुळे तिने याबद्दल वडीलांना विचारले.

सरस्वती हिच्या वडिलांनी त्यांना मोबाईल बद्दल काहीच माहिती नाही असे तिला म्हटले. त्यांनी नंतर असे म्हटले की, त्यांच्या इच्छेविरुद्ध तिने लग्न केले आहे. याच कारणामुळे सरस्वती हिचा फोन लपवला. पण वडीलांनी फोन देण्यास नकार दिला तेव्हा संतप्त झालेल्या सरस्वती हिने त्यांना काठीने जोरजोरात मारहाण करु लागली. तसेच दगडाने सुद्धा त्यांना मारत असताना त्यांचा मृत्यू झाला. सरस्वती हिच्या आईने वडीलांचा मृतदेह अंगणात पुरुन तेथून पळ काढला.(भोपाल: Happen App वरुन अल्पवयीन मुलीला मैत्री करणे पडले महागात, पहिल्याच भेटवेळी तरुणाने केला बलात्कार)

पोलिसांनी असे म्हटले की, त्यांच्या शेजाऱ्यांनी हा सर्व प्रकार पाहिला आणि पोलिसांना त्याबद्दल सांगितले. चंद्रा यांनी असे म्हटले की, दोघींना अटक करण्यात आली असून आयपीसी कलम 302, 323, 201 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.