Relationship (Photo Credits: PixaBay)

वैवाहिक जीवनातील नवरा-बायकोचे भांडण प्रत्येक घरात पहायला मिळते. मात्र आजकाल या दोघांमधील भांडण एवढे विकोपाला जात आहे की, हत्या करण्यापर्यंत मजल जात आहे. परंतु चैन्नई येथे नवरा बायकोचे भांडण झाले. त्यानंतर बायको माहेरी निघुन गेल्याच्या कारणास्तव निराश झालेल्या नवऱ्याने चक्क त्याचे गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तमिळनाडू येथील ही घटना असून बाबू असे पती आणि देवी असे पत्नीचे नाव आहे. या दोघांच्या विवाहाला काही वर्ष झाले तरीही मुल झाले नसल्याच्या कारणावरुन एकमेकांमध्ये वादाची ठिगणी उडत होती. तसेच बाबू हा नेहमीच दारु पित असल्याचे देवी याचा विरोध करत होती. बाबूच्या याच त्रासाला कंटाळून तिला घटस्फोट हवा होती. पण या दोघांमध्ये एवढे जोरात भांडण झाले की देवी थेट माहेरी निघून गेली. त्यानंतर माहेरी गेलेली देवी पुन्हा नव वर्षाच्या स्वागतासाठी घरी आली. त्यावेळी ही बाबू हा अतिप्रमाणात दारु प्यायल्याने दोघांमध्ये भांडण झाले. या प्रकारानंतर घरी आलेली देवी पुन्हा माहेरी निघून गेली.(PUBG मुळे ओळख झालेल्या गर्भवती तरूणीवर मित्रांकडून कुर्ला, वलसाड मध्ये सामुहिक बलात्कार; अत्याचारामुळे पीडितेचा गर्भपात)

 मात्र देवी आपल्याशी भांडून माहेरी निघून गेल्याने बाबू निराश झाला होता. त्यानंतर बाबू घरातील किचन मध्ये जात सुरी हातात घेऊन त्याने गुप्तांग कापले. मात्र गुप्तांग कापल्यानंतर बाबू जोरजोरात किंचाळू लागल्याने शेजाऱ्यांनी धाव घेत त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या बाबू याची प्रकृती गंभीर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.