PUBG मुळे ओळख झालेल्या गर्भवती तरूणीवर मित्रांकडून कुर्ला, वलसाड मध्ये सामुहिक बलात्कार; अत्याचारामुळे पीडितेचा गर्भपात
(Image used for representational purpose)

मुंबई (Mumbai) मधून समोर आलेल्या धक्कादायक घटनेमध्ये एका गरोदर महिलेवर तीन युवकांनी निर्दयी पणे सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याचे समजत आहे. ही घटना सुरुवातीला  कुर्ला (Kurla) परिसरात घडली.यांनतर काही दिवसात शुभम च्या मित्रांनी महिलेला वलसाड येथे नेऊन 2 ऑक्टोबर रोजी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला आणि तिला तसेच सोडून दिले.  महिला आणि एका मुलाची पबजी (PUBG)  खेळताना मैत्री झाल्याचे समजत आहे. साधारण काही महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेबाबत महिलेने अलीकडेच पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. या अत्याचारामुळे पीडित महिलेचा गर्भपात करावा लागला आहे. बुलढाणा: घरात सापडला दिव्यांग महिलेचा विवस्त्र मृतदेह; बलात्कार करून हत्या केल्याचा संशय

काय आहे हे प्रकरण?

पोलिसांच्या माहितीनुसार, कुर्ला येथील घटनेतील पीडित महिला ही मुळात भोपाळची आहे, तिची आरोपी शुभम जाधव या तरुणाशी पबजी खेळात असताना ओळख झाली होती. शुभमने या महिलेला तुला मुंबईत एका ब्युटी पार्लर मध्ये नोकरी देतो हे आश्वासन देत बोलावून घेतले होते. जेव्हा ही महिला दादर रेल्वे स्टेशनवर पोहचली तेव्हा शुभमने तिला तिथून थेट कुर्ला मधील एका हॉटेल मध्ये नेले.

याबाबत पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, शुभमने तिच्या खाण्यात काहीतरी मिसळले होते ज्यामुळे तिची शुद्ध हरपून गेली आणि काय झाले ते तिच्या लक्षातही नव्हते. काही वेळाने जेव्हा महिलेला जाग आली तेव्हा शुभम तिच्या समोर बसला होता आणि तिच्या अंगावर काहीच कपडे नव्हते. यामुळे अगोदरच गांगरून गेलेल्या महिलेला शुभमने आणखीन एक धक्का देत आपण तिच्या सोबत केलेल्या गैरकृत्याचा व्हिडीओ दाखवला आणि जर का याबाबत कुठेही वाच्यता केली तर हा व्हिडीओ लगेच व्हायरल करून अशी धमकी सुद्धा दिली.

दरम्यान, काही दिवसात महिलेचा संपर्क न झाल्याने तिच्या पतीने भोपाळ पोलिसांकडे तक्रार केली, पोलीस तिचा तपास घेत असताना वलसाड मध्ये ही महिला आढळून आल्याची माहिती त्यांना मिळाली आणि मग या महिलेला कुटुंबाशी भेटवत पोलिसांनी तिच्याकडे काय घडले याबाबत विचारणा केली. तेव्हा हा सर्व प्रकार महिलेने उघड करत तक्रार नोंदवली आहे. तूर्तास याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसून तपास सुरु आहे.