Representational Image (Photo Credits: Facebook)

आपल्या उत्पादनांचे प्रमोशन करण्यासाठी जाहिरात हे एक मुख्य माध्यम बनले आहे. आकर्षक ऑफर्स तसेच उत्पादनाची खासियत मोजक्या शबदात आपल्या अंतर्गत असणाऱ्या ग्राहकांकडे पोहचवण्याचे काम जाहिराती करतात. अनेक व्यवसायांना जाहिरातींमुळेच अधिक फायदा होतो असेही प्रकार यापूर्वी समोर आले आहेत, मात्र चेन्नई (Chennai) मधील येथे एका बेकरी चालवणाऱ्या 32 वर्षीय व्यक्तीला आपल्या उत्पादनाची जाहिरात करणे चांगलेच भारी पडले आहे. झालं असं की, या बेकरीच्या मालकाने Whatsapp वरून आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी एक मॅसेज व्हायरल केला होता ज्यात त्याने आमच्या इथे मुस्लिम कर्मचारी काम करत नाहीत असा दावा केला होता, हा मॅसेज म्हणजे धार्मिक तेढ (Communal Negativity) निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असे म्हणत या बेकरी मालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

बेकरी उत्पादनांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या या व्यक्तीने आपल्या व्हॉटअप ग्रुपमध्ये मॅसेज करताना"जैन ऑर्डर बनवून मिळतील, आमच्या इथे मुस्लिम कर्मचारी नाहीत" असे म्हंटले होते. हा मॅसेज पाहिलेल्या एकाने या मालकाच्या विरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली होती. या मॅसेज मध्ये मुस्लिमांना वाईट पद्धतीने दर्शविले गेले होते असे या तक्रारदाराने म्हंटले होते, त्यानुसार मम्बालां पोलिसांनी या बेकरी मालकाला अटक केली आहे.

PTI ट्विट

अलीकडेच, मुंबईत सुद्धा एका व्यक्तीने डिलिव्हरी बॉय हा मुसलमान असल्याने किराणा सामान स्वीकारण्यास नकार दिला होता, या प्रकरणानंतर त्याला सुद्धा अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता चेन्नई मध्ये सुद्धा असाधार्मिक द्वेष दर्शवणारी अपरकार उघडकीस आला आहे.