Dr Manmohan Singh (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरस संकटाच्या अत्यंत अडचणीच्या काळात केंद्रीय कर्मचारी, सेवानित्त कर्मचारी, सैनिक यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढविण्यासऐवजी केंद्रातील मोदी सरकारने (Narendra Modi Govt) त्यात कपात कली. केंद्र सरकारच्या या निर्णयावर काँग्रेस (Congress) पक्ष चांगलाच भडकला आहे. माजी पंतप्रधान, ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंह यांनी केंद्राच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कपात करायला नको होती. कोरोना व्हायरस संकटाच्या अत्यंत अडचणीच्या काळात कर्मचाऱ्यांवर, सैनिकांवर केंद्र सरकारने असा निर्णय लादणे योग्य नाही.

वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे खासदार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारची आश्चर्य वाटणारी गोष्ट म्हणजे, सरकार लाखोर, करोडो खर्च होणारी बुलेट ट्रेन योजना, सेंट्रल विस्टा सौदर्यीकरण योजना यांसारख्या खर्चीक प्रकल्पांना ब्रेक लावत नाही. मात्र, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता मात्र कपात करत आहे. केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत असंवेदनशील आणि अमानवीय आहे. केंद्र सरकार मध्यमवर्गाकडून पैसे घेत आहे. ते गरीबांना न देता सेंट्रल विस्टा प्रकल्पांवर खर्च करत आहे, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे. (हेही वाचा, Coronavirus Lockdown Relaxed: देशभरातील नोंदणीकृत दुकाने सुरु करण्यास MHA ची परवानगी; लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात नेमकं काय सुरु राहणार आणि काय बंद? जाणून घ्या)

यूथ काँग्रेस ट्विट

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनीही केंद्र सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. चिदंबरम यांनी म्हटले की, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कापण्यापेक्षा बुलेट ट्रेन, सेंट्रल विस्टा यांसारख्या योजना थांबविणे गरजेचे होते. काँग्रेस नेते वेणुगोपाल, रणदीप सिंह सुरजेवाला, मनीष तिवारी, सुप्रिया श्रीनाते गौरव वल्लभ, रोहन गुप्ता आणि प्रवीण चक्रवर्ती यांसारख्या काँग्रेस नेत्यांनीही केद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.