Coronavirus Pandemic (Photo Credits: Getty image)

देशात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट वेगाने वाढत असताना सर्वत्र चिंताजनक आणि नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व कठीण काळात मानसिक स्वास्थ्य आणि सकारात्मकता राखण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार विभागाने सोपी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याचे आपण अगदी सहज पालन करु शकतो. सर्वप्रथम कोविड-19 चे संक्रमण रोखण्यासाठी मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे, स्वच्छतेचे पालन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर घरात हवा खेळती ठेवणेही महत्त्वाचे आहे. या साध्या सोप्या उपायांनी कोविड-19 चा फैलाव रोखण्यास मदत होईल. (कोविड वर मात केल्यानंतर 3 महिन्यांनी मिळणार लस, आता स्तनदा माता देखील घेऊ शकतात लस; केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाची नवी नियमावली)

घर, ऑफिसेसमधील दरवाजे-खिडक्या खुल्या असतील तर हवा खेळती राहते. त्यामुळे हवेतील व्याप्त व्हायरल लोड कमी केला जातो आणि संसर्गाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर क्रॉस वेंटीलेशन आणि एक्जॉस्ट फॅनच्या वापरामुळे देखील विषाणूचा फैलाव रोखण्यास मदत होते. (COVID-19 Home Testing Kit: कोविड-19 च्या होम टेस्ट किट 'कोविसेल्फ' चा कोण आणि कसा वापर करु शकता? पहा Video)

पीआयबी ट्विट:

त्याचबरोबर सध्याच्या कठीण काळात तणावमुक्त आणि सकारात्मक राहणे अत्यंत गरेजेचे आहे. यामुळे आपली कोरोनाविरुद्धची निम्मी लढाई जिंकू आणि नियमांचे पालन करुन आपण विषाणूवर मात करण्यात यशस्वी होऊ. दरम्यान, तणावमुक्त राहण्यासाठी काही खास उपाय सुचवले गेले आहेत. गाणं ऐका, नवीन कला शिका, 6-8 तासांची झोप घ्या, मित्रांसोबत गप्पा मारा, ध्यान करा, व्यायाम करा, प्रेम-सकारात्मकता याचा प्रसार करा आणि बातम्या मर्यादीत वेळेतच पहा.

कोरोना व्हायरस शरीरात प्रवेश करुन संक्रमण वाढवतं. या विषाणूला जर मानवी शरीर मिळाले नाही तर तो जगू शकणार नाही. त्यामुळे विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कोरोना त्रिसुत्रीचे पालन केल्यास कोरोना विरुद्धचा लढा आपण जिंकू शकतो.