Rape In India विधानावरून राहुल गांधी यांना केंद्रीय  निवडणूक आयोगाची नोटीस
Rahul Gandhi | (Photo Credit: Facebook)

काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अलीकडेच केलेल्या 'रेप इन इंडिया' (Rape In India) या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. याविरुद्ध केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्यासहित भाजप (BJP) महिला खासदारांनी देखील लोकसभेत (Loksabha) राहुल यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला होता, हे विधान अत्यंत अपमानास्पद असल्याचे म्हणत यासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी देखील मागणी करण्यात आली होती मात्र आपण काहीही झालं तरी माफी मागणार नाही अशी भूमिका राहुल यांनी स्पष्ट केली होती. अखेरीस या वादात आता केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.

प्राप्त माहितीनुसार, राहुल यांनी संथालपरगणा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बलात्काराच्या वाढत्या घटनांच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर निशाणा साधत, मोदींचे 'मेक इन इंडिया' आता भारतात 'रेप इन इंडिया' बनले आहे, असे वक्तव्य केले होते. भारतात दररोज बलात्कारासारखे गुन्हे घडत असल्याचेही राहुल म्हणाले होते. तर राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून भाजप खासदारांनी लोकसभेत जोरदार निषेध केला होता. भाजपच्या महिला खासदारांनी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली होती.  (काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी, वीर सावरकर यांचे नातू रंजीत सावरकर यांची सरकारकडे मागणी)

तर, दुसरीकडे, राहुल गांधी यांनी याच आक्षेपार्ह्य विधानांची मालिका कायम ठेवत अलीकडेच भारत बचाव रॅलीत आपण माफी मागायला काही राहुल सावरकर नसून राहुल गांधी आहोत असे नवे विधान केले होते, राहुल गांधी यांच्या या भूमिकेविरुद्ध अखेरीस स्मृती इराणी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जैवर आधारित ही नोटा स राहुल यांना धाडण्यात आली आहे, आता राहुल या नोटीसला काय उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.