महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्युची सीबीआय चौकशी करावी, उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला जातोय- शिवसेना
Sanjay Raut | (Photo Credits-ANI)

महंत नरेंद्र गिरी (Mahant Narendra Giri) यांच्या संशयास्पद मृत्युची सीबीआय (CBI) चौकशी करावी अशी मागणी शिवसेना (Shiv Sena) पक्षाने केली आहे. महंत नरेंद्र गिरी यांचे आशीर्वाद शिवसेनेला अनेकदा मिळाले आहेत. आम्ही अनेकदा त्यांना भेटलो आहे. त्यांचे व्यक्तिमत्व पाहता ते आत्महत्या करतील असे वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशी करण्या यावी. नरेंद्र गिरी यांचा मृत्य पाहता उत्तर प्रदेश राज्यात हिंदुत्त्वाचा गळा घोटला जातो आहे की काय असेच आम्हाला क्षणभर वाटते, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत ([Poll ID="null" title="undefined"]) यांनी ही भूमिका मांडली आहे. ते दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाराष्ट्रात पालघर येथे जमावाच्या मारहाणीत काही साधूंचा मृत्यू झाला होता. या वेळी महाराष्ट्रातील भाजप सोडाच परंतू, देशभरातील भाजपने असे वातावरण केले होते की, जणू महाराष्ट्रात हिंदुत्त्वाचा गळा घोटला जातो आहे. महाराष्ट्र सरकारने तातडीने निर्णय घेत पालघर येथे साधूंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. आता आमचीही अशीच मागणी आहे उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाची चौकशी सीबीआयद्वारे करावी.  (हेही वाचा, Mahant Narendra Giri Passes Away: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे आज निधन)

दरम्यान, महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकार भक्कम आहे. हे सरकार पाच वर्षे चालेल. विरोधकांनी कितीही जोर लावला तरी हे सरकार पडणार नाही. महाराष्ट्र सरकार हे कायद्याने चालणारे सरकार आहे. तसेच, या सरकारला जनतेची मान्यता आहे. त्यामुळे कोणी कितीही आरोप केले तरी फरक पडत नाही. एखाद्याने राजकीय जीवनात जर चिखल उडवायचेच ठरवले असेल तर त्याला आपण काही करु शकत नाही. मात्र, जर कोणाबद्दलही कोणाकडे काहीही विशेष माहिती असेल तर ती त्यांनी पोलीस अथाव संबंधीत यंत्रणेकडे नेऊन द्यावी, असा टोलाही राऊत यांनी या वेळी लगावला.