सीबीआय (CBI) कडून सोमवारी 3 ऑक्टोबर दिवशी रशियन नागरिकाला iLeon software हॅक केल्याप्रकरणी अटक केली आहे. iLeon software द्वारा जेईई 2021 परीक्षा घेण्यात येते. Mikhail Shargin असं त्याचं नाव असून Rouse Avenue Court मध्ये त्याला दाखल करण्यात आले होते. सीबीआय कडून त्याची 2 आठवड्यांची कस्टडी मागण्याची तयारी आहे. परीक्षे दरम्यान काही चूका झाल्याच्या प्रकरणी तपासामध्ये त्याच्यापर्यंतचे धागेदोरे सापडले आहेत. सीबीआय ने दिलेल्या माहितीनुसार, त्याने सॉफ्टवेअर हॅक केले आहे.
Shargin याला Bureau of Immigration कडून IGI Airport वर कारवाई करण्यात आली आहे. Almaty, Kazakhstan वरून भारतामध्ये आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याच्या विरूद्ध लूक आऊट सर्क्युलर जारी झाले होते. JEE (Mains)सह अनेक ऑनलाईन परीक्षांमध्ये घोटाळे झाल्याचं समोर आलं होतं. त्याच्यानंतर काही परदेशी नागरिकांच्या सहभागाची बाब समोर आली होती.
iLeon software हॅक करण्यामध्ये इतर आरोपींसोबत रशियन नागरिकाचा देखील सहभाग होता. त्यांनी परीक्षेदरम्यानही काही कम्प्युटर्स हॅक केले होते. 2021 मध्ये तक्रार दाखल झाली असून ही काही खाजगी कंपन्या, त्यांचे संचालक आणि 3 कर्मचार्यांविरूद्ध होती. जेईई मेन्स परीक्षेमध्ये काही गैरप्रकार झाल्याची बाबी मध्ये यासंचालकांकडून काही विद्यार्थ्यांना टॉपच्या NITs मध्ये प्रवेश मिळावेत म्हणून मोठी रक्कम घेऊन त्यांच्या चालू परीक्षेत संगणक हॅक करून प्रश्नावली सोडवली जात होती.
Shargin हा 10वी, 12वी ची मार्क्सशीट, युजर आयडी, पासवर्ड, पोस्टडेटेड चेक घेत होते. एकदा त्यांचे अॅडमिशन झाले की त्यांच्याकडुन 12-15 लाख घेत असल्याचं सीबीआय ने सांगितलं आहे.
2021 मध्ये तक्रारीनंतर तपासादरम्यान 19 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. यामध्ये पुणे, जमशेदपूर, बेंगलूरू, दिल्ली-एनसीआर, इंदौर यांचा समावेश आहे. या ठिकाणी 25 लॅपटॉप्स. 7पीसी, 30 पोस्ट डेटेड चेक यांचा समावेश आहे.