Foreign Minister S Jaishankar | (Photo Credits: Twitter)

आंतरराष्ट्रीय न्यायालयात ( International Court Of Justice) कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav ) प्रकरणात निकाल भारताच्या बाजूने लागला. तर, पाकिस्तानला मोठा दणका बसला. त्यानंतर देशभरात जल्लोष सुरु आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही संपूर्ण भारत कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. तसेच, सरकार यापुढेही कुलभूषण जाधव यांच्यासाठी ही लढाई कायम ठेवणार ठेवणार असल्याचे म्हटले आहे. एस. जयशंकर यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. या वेळी बोलताना एस. जयशंकर (Foreign Minister S Jaishankar) म्हणाले की, आम्ही पुन्हा एकदा पाकिस्तानला सांगू की कुलभूषण जाधव यांना मायदेशी पाठवा.

पुढे बोलताना एस. जयशंकर यांनी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांची दाखवलेल्या साहस आणि धिराचे कौतुक केले. हे संसद आणि संपूर्ण देश जाधव कुटुंबीयांच्या पाठी आहे. हे सरकार कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी अनेक प्रयत्न करेन. या वेळी बोलताना परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, 2017 मध्ये सरकारने निश्चय केला होता की, जाधव यांच्या सुरक्षेसाठी सुनिश्चितता मिळवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेन. या प्रयत्नात कायदेशीर लढाई लढण्याचीही सरकारने संपूर्ण तयारी केली आहे. या वेळी एस. जयशंकर यांनी भारताचे वकील हरीश साळवे यांनी दाखवलेल्या चातूर्याचेही कौतुक केले.

दरम्यान, भारतीय नागरिक आणि नौदलाचा माजी अधिकारी कुलभूषण जाधव खटल्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आपला निर्णय दिला. ICJ ने पाकिस्तानी न्यायालयाने यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. तसेच, पाकिस्तानी कोर्टाने कुलभूषण जाधव यांना ठोठावलेल्या शिक्षेचा पूनर्विचार करावा असेही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटले आहे. कुलभूषण जाधव यांना बचाव करण्यासाठी आवश्यक काऊन्सिलर अॅक्सीस देण्याचे आदेशही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिले आहेत. (हेही वाचा, कुलभूषण जाधव खटला: आंतरराष्ट्रीय न्यायालयात 16 न्यायाधीश देणार महत्वपूर्ण निकाल; घ्या जाणून)

या खटल्यात भारत सरकार विरुद्ध पाकिस्तान सरकार असे दोन देश एकमेकांविरुद्ध प्रतिवादी होते. गेली प्रदीर्घ काळ हा खटला सुरु होता. आज या खटल्यावर अंतिम सुनावणी झाली. भारत, पाकिस्तान देशांसोबतच जगभरातील जाणकारांचे लक्ष या खटल्याकडे लागले होते. सर्वसामान्य नागरिकांनाही या खटल्याबाबत प्रचंड उत्सुकता होती.