CAA Protest: नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशात संतापाची लाट, यूपी आणि दिल्लीत हिंसाचारामुळे 10 जणांचा मृत्यू
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन (Photo Credits-ANI)

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात अद्याप देशभरातून संतापाची लाट उसळत आहे. या दरम्यान केल्या जाणाऱ्या आंदोलनांना सुद्धा हिंसक वळण लागले असून यामध्ये आतापर्यंत 10 जणांना मृत्यू झाला आहे. युपी आणि दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशासह अन्य राज्यात सुद्धा या कायद्याला जोरदार विरोध करण्यात येत आहे. याच कारणास्तव आज उत्तर प्रदेशातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

उत्तर प्रदेशाचे पोलीस महानिर्देशक ओपी सिंह यांनी असे म्हटले आहे की, मृतांना गोळी लागून मृत्यू झालेला नाही. तर टाइम्स ऑफ इंडिया यांच्या मते, मृत आणि जखमी झालेल्यांना गोळी लागली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जखमी झालेल्या लोकांमध्ये पोलीस कर्मचारी सुद्धा आहेत. तर कानपूर येथे बाबूपुरवा येथे हिंसक आंदोलनामुळे 13 जण जखमी झाले आहेत. त्याचसोबत 5 शिपाई आणि एक स्थानिक नागरिक जखमी झाला आहे. हिंसाचार केल्याप्रकरणी 25 जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली येथे दरियागंज या परिसरात शुक्रवारी आंदोलनाने हिंसेचे वळण घेतले. तर आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांनी वाहनांना आग लावत दिल्ली गेट परिसरात दगडफेक केली. त्याचसोबत मध्य प्रदेश येथील जबलपूर येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.बिहार येथील दरभंगा येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकत्यांकडून आज आंदोलन करण्यात येत आहे.या कार्यकर्त्यांनी बिहार बंदची हाक दिली आहे. (नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शन करणार्‍यांवर कडक कारवाई करा- स्मृती इराणी)

ANI Tweet:

याच परिस्थितीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्रीय सरकारवर निशाणा साधला.  तसेच सोनिया यांच्या व्यतिरिक्त प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी संध्याकाळी इंडिया गेट येथे नागरिकता संशोधन कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांमध्ये सहभागी झाल्या.  त्यांनी असे म्हटले की, हा कायदा आणि एनआरसी गरिबांच्या विरोधात आहे. जामा मस्जिद येथे सुरु असलेल्या आंदोलनात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती. त्यांनी असे म्हटले की जर सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा मागे न घेतल्यास हे आंदोलन पुढे असेच सुरु राहणार असल्याचा इशारा दिला आहे.