नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (Citizenship Amendment Act) विरोधात संपूर्ण देशभरात अंदोलन केली जात आहेत. यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात निर्दशन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, अशी विनंतीही स्मृती इरानी यांनी केली आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात संपूर्ण देश पेटला असून राजकीयनेत्यांकडून अंदोलनकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे.
नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र यांच्यासह अनेक राज्यात अंदोलन करण्यात आली आहे. यात भाजपचा बचाव करत स्मृती इराणी म्हणाल्या की, नागरिकत्व दुरूस्ती कायदा कोणत्याही भारतीय नागरिकांचे नागरिकत्व हिसकावून घेणार नाही. भारतीय संविधानात नागरिकांच्या अधिकारांना मजबूत केले आहे. तसेच भाजप या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी समर्थ आहे. त्याचबरोबर नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, अशी विनंती स्मती इराणींनी केली आहे. तसेच नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात निर्दशन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशीही मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. हे देखील वाचा-Citizenship Amendment Act: संगमनेर येथे काळ्या फिती बांधून आंदोलनकर्त्यांकडून केंद्र सरकारचा निषेध
कोणत्याही चुकीच्या निर्णयाच्या विरोधात अंदोलन करणे हा नागरिकांचा हक्क आहे. परंतु, कायद्याला धक्का लागणार नाही याची नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. तसेच सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन अनेक राजकीय नेत्यांनी केले आहे.