Citizenship Amendment Act: संगमनेर येथे काळ्या फिती बांधून आंदोलनकर्त्यांकडून केंद्र सरकारचा निषेध
Protest Representative Image (Photo Credits: PixaBay)

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (Citizenship Amendment Act) विरोधात संपूर्ण देशातून तीव्र अंदोलन करण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यातून भव्य मोर्चाही काढण्यात आले आहेत. दरम्यान परभणी (Parbhani), हिंगोली (Hingoli), बीड (Beed) जिल्ह्यातील अंदोलनकर्त्यांनी अंदोलनाला हिंसक वळण देऊन राज्य सरकारच्या वाहनांवर दगडफेक केली आहे. यानंतर संगमनेर (Sangamner) येथूनही नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान, संगमनेर येथील अंदोलनकर्त्यांनी काळ्या रंगाच्या भिती बांधून केंद्र सरकारचा (Central Government) निषेध केला आहे. संगमनेर येथील मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामुळे हे अंदोलन शांततापूर्वक पार पाडले जाईल, अशी अपेक्षा केली जात आहे.

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात मुंबई, नागपूर, उस्मानाबाद, बीड, याच्यासह अनेक शहरात अंदोलन पाहायला मिळाले. परंतु, परभणीतील अंदोलनकर्त्यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. परभणीत गुरुवारपासून शांततापूर्वक अंदोलन करण्यात आली होती. पंरतु, आज या अंदोलनाला हिंसक वळण मिळत असल्याचे समोर आले आहे. यातच संगमनेर तालुक्यात अनोख्या पद्धतीने अंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान, संगमनेर येथील नागरिकांनी काळ्या रंगाची फिती बांधून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवला. अंदोलकर्त्यांनी शांततापूर्वक अंदोलन पार पाडावे. तसेच कोणत्याही खोच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. हे देखील वाचा-महाविकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार 24 डिसेंबरला?

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात महाराष्ट्रातील काही शहरात अंदोलकांनी मोर्चाला हिंसक वळण दिले आहे. महाराष्ट्रातील काही भागात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे तर, काही ठिकाणी वाहनांना पेटवण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता राखावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता आणि सुव्यवस्थेला गालबोल लागेल अशी वर्तणूक करु नये, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी अंदोलनकर्त्यांकडे केले आहे. महत्वाचे म्हणजे नागरिकांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या संबंधित कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या कायद्याच्या नेमका अर्थ काय याची माहिती समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.