महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकाराचं हिवाळी अधिवेशन नागपूरामध्ये सुरू आहे. दरम्यान विधानसभा निवडणूकीनंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना पक्षाने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे. 28 नोव्हेंबर दिवशी उद्धव ठाकरेंसह 6 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. आता या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार हा मंत्रिमंडळ विस्तार येत्या 24 डिसेंबर दिवशी होण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत जेव्हा ठरेल तेव्हा सांगितले जाईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
नागपूरातील विधिमंडळ अधिवेशनानंतर मुंबईमध्ये आता मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचालींना वेग आला आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारात 29 जण शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेचे 10. एनसीपीचे 11 आणि कॉंग्रेसचे 8 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रीपदच्या वाटपानुसार, 42 पैकी शिवसेनेला 15, एनसीपीला 16 आणि कॉंग्रेस पक्षाला 12 मंत्रिपदं मिळू शकतात. मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील यांची नावं चर्चेमध्ये आहेत.
दरम्यान नागपूरमध्ये सुरू असलेले विधिमंडळ अधिवेश्न 16 ते 21 डिसेंबर दरम्यान चालणार आहे. यामध्ये नागरिकत्व कायद्यापासून ते राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाली. दरम्यान आक्रमक विरोधकांमध्ये विधिमंडळ अधिवेशनाचे पहिले 2 दिवस गाजले होते.