माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही असे एका सभेत सांगताना, भाजपला मुस्लिमांचे दुश्मन म्हंटले होते, इतकेच नव्हे तर भाजपने महाराष्ट्रापासून दूर राहावे यासाठी अनेक मुस्लिम संघटना व बांधवानी आम्हला शिवसेनेसोबत जाण्याची केली आणि म्ह्णूनच महाविकासाआघाडी स्थापून भाजपला राज्यातून दूर करण्यात आले आहे असेही चव्हाण यांनी के सभेत म्हंटले होते, या सर्व विधानांवर आज भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांनी पलटवार करत काँग्रेस (Congress) हे केवळ मुस्लिमांना चिथावत आहे. अशा या बेताल वक्तव्यांसाठी सोनिया गांधी (Sonia Gandhi) व शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षप्रमुख म्ह्णून माफी मागावे अशी मागणी संबित पात्रा त्यांनी केली आहे. आज दिल्ली (Delhi) येथील भाजपच्या मुख्यालयातून पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आजच्या दिवसाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा CAA वरून विरोध करता असताना भाजपवर पार बाप काढून हल्ला केला होता,मुस्लिमांच्या बाजूने काँग्रेसने जरूर काम करावी पण त्यात हिंदूंचा अवमान का केला जातोय असा सवाल संबित पात्रा यांनी केला. तर दुसरीकडे, अकबरुद्दीन ओवेसी यांनी काल मुस्लिमांनी 800 वर्ष देशावर राज्य केले. इथे सर्व ठिकाणी मुस्लिमांचे छाप आहेत असे विधान केले होते, मात्र यावर बोलताना संबित यांनी ओवेसी ही स्वतः जिन्ना बनण्याच्या वाटेवर आहेत असे म्हणत टीकास्त्र सोडले.
याशिवाय "मागील अनेक वर्षांपासून त्यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी मुस्लिमांचा वापर केला आहे. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणतानाही राहुल गांधी यांनी काँग्रेसला 2018 मध्ये 'मुस्लिम पक्ष' म्हंटले होते. जर का राष्ट्रात त्यांना केवळ मुस्लिमांसाठीच काम करायचे असेल तर त्यांनी आपले नाव इंडियन नॅशनल काँग्रेस पासून बदलून मुस्लिम लीग काँग्रेस असे ठेवावे" असेही संबित यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, CAA विरोधावर आज सर्वोच्च न्यायालयाकडून तात्काळ स्थगिती देण्यास नकार दिला गेला आहे. मात्र केंद्र सरकारने या याचिकांवर स्पष्टीकरण द्यावे असे निर्देश कोर्टाकडून देण्यात आले आहेत.