Abhishek Manu Singhvi (फोटो सौजन्य - फेसबुक)

Parliament Winter Session: शुक्रवारी राज्यसभेत (Rajya Sabha) नवा वाद पाहायला मिळाला. विरोधी पक्षाचे खासदार अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांच्या जागेवरून नोटांचे बंडल सापडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेनंतर आज राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी या विषयाची माहिती सभागृहाला दिली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे या मुद्द्यावर बोलण्यासाठी उभे राहिले असता सत्ताधारी पक्षातील लोकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर खरगे संतापले आणि म्हणाले की, तुम्ही असे मूर्खपणाचे काम करून देशाची बदनामी करत आहात. या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री आणि सभागृह नेते जेपी नड्डा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सभापती धनखर यांनी सांगितलं की, मला अशी माहिती मिळाली आहे की, काल सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर नेहमीच्या तोडफोड विरोधी तपासणीदरम्यान चलनी नोटांचे बंडल जप्त करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, हे बंडल 222 व्या क्रमांकावरील सीटखाली सापडले. ही जागा काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी यांना देण्यात आली आहे. ते 2024-26 साठी तेलंगणातून राज्यसभेचे खासदार आहेत. (हेही वाचा -Opposition Protest on Adani Bribery Case: 'मोदी-अदानी एक है' विरोधकांचे आंदोलन, तृणमूल काँग्रेस काहीसा दूरच)

दरम्यान, या मुद्द्यावर बोलण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे उठले असता धनखर यांनी त्यांना फक्त नोटांच्या बंडलच्या मुद्द्यावर बोलण्यास सांगितले. त्यानंतर खर्गे म्हणाले की, मला माहीत आहे की मी इतर कोणत्याही मुद्द्यावर बोललो तर तुम्ही मला बोलू देणार नाही. माझी एकच विनंती आहे की, जोपर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे, तोपर्यंत ज्याच्या जागेवरून बंडल सापडले त्या व्यक्तीचे नाव सांगू नये. खरगे यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी गटातून गदारोळ झाला. यावेळी खर्गे यांचा संयम सुटला आणि म्हणाले की तुम्ही सगळे खोटे आहात. अशी चिखलफेक करून तुम्ही देशाची बदनामी करत आहात. (हेही वाचा, Rahul Gandhi Mocks PM Modi-Adani With Poster: 'एक है तो सेफ है' मोहिमेवरुन जोरदार हल्ला; राहुल गांधी यांनी झळकावले नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे पोस्टर)

अभिषेक मनू सिंघवी यांची प्रतिक्रिया -

या मुद्द्यावर अभिषेक मनू सिंघवी यांचे वक्तव्यही आले आहे. त्यांनी सांगितले की, गुरुवारी ते सभागृहात गेले मात्र तेथे केवळ तीन मिनिटेच थांबले. 12:57 वाजता सभागृहात गेलो होतो. सुरक्षा तपासणी दरम्यान, मला गुरुवारी संध्याकाळी नोट सापडल्याची माहिती मिळाली. आजपर्यंत कधीच ऐकले नव्हते. मी घरातून बाहेर पडताना 500 रुपयांची नोट सोबत घेऊन जातो. मी 12:57 ला सभागृहात पोहोचलो आणि 1 वाजता बाहेर आलो. मग मी दीड वाजेपर्यंत कॅन्टीनमध्ये बसलो आणि मग संसद भवनातून बाहेर पडलो.