तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) आणि समाजवादी पक्ष (Samajwadi Party) यांनी संसदेत गौतम अदानी लाचखोरी (Adani Bribery Case) प्रकरणावरून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या निदर्शनांमध्ये (Opposition Protest) सहभागी होण्यापासून स्वत:ला दूर ठेवले. त्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये असलेल्या मतभेदांच्या चर्चांना अधिक बळ मिळाले. दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यासह काँग्रेस खासदारांनी 'मोदी अदानी एक है, अदानी सेफ है "अशा घोषणा असलेले जॅकेट परिधान करून संसदेत निदर्शने केली
सपा, तृणमूल काहीसे दूर
गौतम अदानी लाचखोरी प्रकरणावरून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आंदोलनात सहभाग तृणमूल काँग्रेस सहभागी नसल्याबद्दल बोलताना पक्षाचे खासदार कीर्ति आजाद यांनी सांगितले की, संसदीय रणनीतीबाबत बोलायचे तर आम्ही एकत्रच आहोत. पण असे असले तरी, पक्षाला वेगवेगळे मुद्दे सोडवायचे आहेत. त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, "सभागृहाच्या पटलावर, आमची रणनीती सारखीच आहे, परंतु त्याच वेळी, आम्हाला इतर वेगवेगळे मुद्दे ठळकपणे मांडायचे आहेत." दरम्यान, समाजवादी पार्टीचे खासदार रामगोपाल यादव यांनीही या आंदोलनात सहभागी नसल्यबाबत बोलताना टाळाटाळ करत दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले की, आम्ही कुठे एकत्र नाही? निषेध म्हणून आम्ही एकत्रच आहोत. (हेही वाचा, Rahul Gandhi Mocks PM Modi-Adani With Poster: 'एक है तो सेफ है' मोहिमेवरुन जोरदार हल्ला; राहुल गांधी यांनी झळकावले नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे पोस्टर)
संसदेत काँग्रेसची निदर्शने
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी 'मोदी अदानी एक है, अदानी सेफ है "अशा घोषणा असलेले जॅकेट परिधान करून संसदेत निदर्शने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी अडाणींना संरक्षण देत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. "पंतप्रधान मोदी अदानी यांची चौकशी करू शकत नाहीत कारण जर त्यांनी असे केले तर त्यांची स्वतः चौकशी होईल... मोदी आणि अदानी एक आहेत", असे गांधी म्हणाले. प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांनी निवेदन आणि संसदेत सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली. अदानी समूहाशी निगडीत फसवणूक आणि लाचखोरीच्या आरोपांची संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) चौकशी करण्याची मागणीही काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केली आहे. (हेही वाचा, Samvidhan Sammelan Nagpur: संविधान हा फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार, जात जनगणना होणारच; संविधान संमेलनातून राहुल गांधी यांचा हुंकार)
काँग्रेस आक्रमक
मोदी अडानी एक है और इस सच्चाई को मीडिया आपको कभी नहीं दिखाएगा। pic.twitter.com/Dum0IQb0qR
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 5, 2024
तृणमूल काँग्रेसने इतर मुद्द्यांना प्राधान्य दिले
काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी आदानीचा मुद्दा घेतला असला तरी, तृणमूल काँग्रेस पक्षाने मात्र महागाई, बेरोजगारी आणि विरोधी पक्षांच्या नेतृत्वाखालील राज्यांसाठी निधीची कथित वंचितता यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आणि अदानी-विशिष्ट आंदोलनापासून स्वतःला दूर ठेवले.
गौतम अदानी यांच्यासबत पंतप्रधना मोदी, काँग्रेसकडून एक्स पोस्ट
Modani 🤝 pic.twitter.com/MfjG11nbOZ
— Congress (@INCIndia) December 5, 2024
अदानी यांच्याविरोधात आरोप
अदानी समूहाने 2020 ते 2024 दरम्यान सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच देण्याचे आश्वासन दिल्याच्या अमेरिकन सरकारी वकिलांच्या आरोपांमुळे हा वाद निर्माण झाला आहे. अदानी समूहाने हे दावे जोरदारपणे फेटाळले असून त्यांना 'निराधार' म्हटले आहे.
संसदेची कार्यवाही स्थगित
विरधी पक्षांकडून सुरू असलेल्या निदर्शनांमुळे लोकसभेचे कामकाज स्थगित करावे लागले.. विरोधी पक्षांनी मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान संभळमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचाराबरोबरच अदानी प्रकरणाबद्दल आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले.