Bulandshahr violence: उत्तरप्रदेशातील बुलंदशहर (Bulandshahr) येथे गोहत्येच्या संशयावरुन उसळलेल्या हिंसाचाराने (violence) इंस्पेक्टर सुबोध कुमार सिंग (Subodh Kumar Singh) यांचा बळी घेतला. यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा अपघात होता मॉब लॉन्चिंग नाही, असे म्हटले आहे. त्यापूर्वी सुबोध सिंग यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
उत्तर प्रदेशात मॉब लॉन्चिंगची कोणतीही घटना घडलेली नाही. बुलंदशहरातील घटना ही एक दुर्घटना असून यात कायदा आपले काम करत आहे. कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही. केवळ गोहत्याच नाही तर बेकायदेशीर कत्तल करण्यावर पूर्ण उत्तर प्रदेशात बंदी आहे आणि यासाठी संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असेही योगी आदित्यानाथ म्हणाले. हे ही वाचा : सुबोध सिंग यांच्या मुलाचा संताप
या हिंसेनंतर पाचजणांना अटक झाली असून 87 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इंस्पेक्टर सुबोध कुमार सिंग हत्येप्रकरणी योगेश राज याला मुख्य आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी एडीजी प्रशांत किशोर यांचा खुलासा
बुलंदशहर जिल्ह्यातील सियाना येथे गोहत्येचे अवशेष सापडले होते. त्यानंतर संतप्त जमावाने रास्ता रोको करत घटनेचा निषेध केला. तसेच जाळपोळ करण्यात आली. त्यावेळेस जमावाला आवर घालण्यासाठी पोलीसांनी गोळीबार केला. त्यात एक तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर संतप्त जमावाने पोलिस ठाण्यावर हल्ला चढवला. त्यात सुबोध कुमार सिंग यांचा मृत्यू झाला.