Bulandshahr Violence: हिंदू-मुस्लिम वादात माझ्या वडिलांना जीव गमवावा लागला; सुबोध सिंग यांच्या मुलाचा संताप

हिंदू मुस्लिम वादाने माझ्या वडिलांचा बळी घेतला. इंस्पेक्टर सुबोध कुमार सिंग यांच्या मुलगा अभिषेक सिंग याने अशाप्रकारे व्यक्त केला संताप.

Bulandshahr Violence: हिंदू-मुस्लिम वादात माझ्या वडिलांना जीव गमवावा लागला; सुबोध सिंग यांच्या मुलाचा संताप
शहीद पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंगI मुलगा अभिषेक सिंग (Photo Credit: ANI/File)

Bulandshahr Violence: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर (Bulandshahr) जिल्ह्यातील गोहत्येच्या संशयावरुन उसळलेल्या हिंसाचाराने (violence) इंस्पेक्टर सुबोध कुमार सिंग (Subodh Kumar Singh) यांचा बळी घेतला आहे. या हिंसेनंतर सुबोध सिंग यांचा मुलगा अभिषेक सिंगने एक सवाल उपस्थित केला आहे. "धर्माच्या नावाखाली समाजात हिंसाचार न माजवणारा चांगला नागरिक होण्याची शिकवण माझ्या वडिलांनी मला दिली आहे. हिंदू मुस्लिम वादाने माझ्या वडिलांचा बळी घेतला असून उद्या दुसरं कोणाच्या तरी वडिलांना आपले प्राण गमवावे लागतील," असे अभिषेक सिंग याने म्हटले आहे. या घटनेनंतर सुबोध सिंग यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

या हिंसेनंतर मंगळवारी दोघांना अटक करण्यात आली तर चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर 87 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इंस्पेक्टर सुबोध कुमार सिंग हत्येप्रकरणी योगेश राज याला मुख्य आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.  अखलाक हत्या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी सुबोध सिंग यांची जमावाकडून हत्या

बुलंदशहर जिल्ह्यातील स्याना येथे गोहत्येचे अवशेष सापडले होते. त्यानंतर संतप्त जमावाने रास्ता रोको करत घटनेचा निषेध केला. तसेच जाळपोळ करण्यात आली. त्यावेळेस जमावाला आवर घालण्यासाठी पोलीसांनी गोळीबार केला. त्यात एक तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर संतप्त जमावाने पोलिस ठाण्यावर हल्ला चढवला. त्यात सुबोध कुमार सिंग यांचा मृत्यू झाला. बुलंदशहर येथील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2018 12:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).