Bulandshahr Violence: पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी एडीजी प्रशांत किशोर यांचा खुलासा
बुलंदशहर हिंसाचार (Archived, edited, symbolic images)

Bulandshahr Violence: बुलंदशहर(Bulandshahr) येथील सियाना परिसरात घडलेल्या कथीत गोहत्येवरुन भडकलेल्या हिंसाचारात एसएचओ सुबोधकुमार सिंग (Subodh Kumar Singh) यांच्यासह दोण जणाचा बळी गेला. या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. मात्र आज मेरठ झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG) प्रशांत कुमार  यांनी पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी खुलासा केला आहे.

बुलंदशहर येथे झालेल्या गोहत्येप्रकरणी सुट्टीवर आलेल्या जवानाने गोळीबार केल्याचे सांगितले जात होते. मात्र  प्रशांत कुमार यांनी सुबोधकुमार यांच्या हत्येप्रकरणी एक जवान आरोपी असल्याचे शुक्रवारी सांगितले. तसेच  जीतूचा या हत्येशी थेट संबंध असल्याचे अजून समोर आले नसल्याचे ही प्रशांत कुमार यांनी म्हटले आहे. यापूर्वी मीडियासमोर आलेल्या माहितीनुसार एसआयटी (SIT) आणि एसटीएफ (STAF) यांच्या तपासणीनुसार शहीद सुबोधकुमार यांची हत्या जम्मू मधील जीतू या जवानाने गोळी झाडली होती. तर हा जवान सुट्टीसाठी गावी आला होता. त्यावेळी त्याच्याजवळ असलेल्या अवैध बंदूकीने गोळीबार केला. त्यानंतर त्याने जम्मूमध्ये पळ काढला. या घटनेला मेरठ झोनचे प्रशांत कुमार यांनी फेटाळून लावले आहे. हेही (वाचा- Bulandshahr Violence: बजरंग दल, विहिंप, भाजयुमो कार्यकर्त्यांसह 87 जणांवर FIR)

तसेच पोलिसांनी जीतूला अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी जीतू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यासाठी एका पथकाला जम्मूमध्ये पाठविण्यात आले आहे. मात्र जीतूच्या आईने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले की, जर जीतूने पोलीस निरिक्षकावर गोळ्या झाडल्या असतील तर त्याचीसुद्धा गोळ्या घालून हत्या करा असे म्हटले आहे. या प्रकरणी मांस कोणाचे होते यावर तपास चालू असून त्याबद्दल अधिक माहिती पुढे आल्यावर यामागील खुलासा होणार आहे. तसेच शहीद सुबोधकुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी ही जीतूवरील आरोप फेटाळून लावले आहे.