Budget 2024: मोदी सरकारच्या अंतरिम बजेट मध्ये महिला, तरूण आणि सामान्य वर्गाला पहा काय मिळालं?
Budget | File Image

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman)  यांनी आज लोकसभेमध्ये अंतरिम बजेट (Interim Budget 2024) सादर केले आहे. आजचा मोदी सरकरच्या दुसर्‍या टर्म मधील हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने तो पूर्ण अर्थसंकल्प नसून अंतरिम अर्थसंकल्प आहे. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना आकर्षिक करणार्‍या काही घोषणा होऊ शकतात असा अंदाज काहींना होता परंतू आज 58 मिनिटांच्या भाषणामध्ये अर्थमंत्र्यांनी कोणतीच मोठी लोकप्रिय घोषणा केलेली नाही. परंतू महिला आणि तरूणांचे काही खास गोष्टींकडे लक्ष वेधून घेतले आहे.

महिलांसाठी काय घोषणा?

मोदींनी काल अर्थसंकल्पाच्या पहिल्या दिवशी बजेट नारी शक्तीला सलाम करणारं असेल असं म्हटलं होतं. त्यानुसार महिलांसाठी नव्या घोषणा झालेल्या नाहीत परंतू महिलांचे आरोग्य आणि देशातील विकासातील वाटा पाहता त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने 2 महत्त्वाच्या घोषणा झाल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी बजेट मध्ये आंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस यांनाही आता आयुष्यमान भारत सुविधेचा लाभ घेता येणार असल्याचं म्हटलं आहे तर गर्भशयाच्या कॅन्सरची लस 9 ते 14 वयोगटातील मुलींना देण्यासाठी प्रयत्न केले जातील असं म्हटलं आहे. 1 कोटी महिलांनी लखपती दीदी चा फायदा घेतला आहे आता त्याची व्याप्ती वाढवून 3 कोटी करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे. उद्योजकतेच्या जोरावर महिला सक्षमीकरण केले जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.

तरूणांना काय मिळाले?

तरूणांसाठी या तंत्रज्ञान प्रगत जगात संधीच्या अमाप संधी आहेत. त्या उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. तसेच शिक्षण क्षेत्रासाठी 1,12,898.97 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवे मेडिकल कॉलेज सुरू करण्याची सरकारची योजन असल्याचे अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितले. तसेच या संदर्भात एका कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर देखील भर देण्यात येणार आहे. 7 आयआयआयटी, सात आययआयएम, 16 एम्स आणि 390 विद्यापिठांची स्थापना करण्यात येणार आहे. PM Modi on Interim Budget 2024: 'यंदाचं बजेट देशाच्या निर्माणाचं बजेट'- पंतप्रधान मोदींनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अंतरिम अर्थसंकल्पाचे केले कौतुक .

सर्वसामान्यांसाठी घोषणा

5 वर्षांत 2 कोटी गरिबांसाठी घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागांत आणखी दोन कोटी घरं बांधली जाणार आहेत तर रूफटॉप सोलर प्लान अर्थात सौरऊर्जा योजनेअतंर्गत 1 कोटी घरांना 300 यूनिटप्रती महीना मोफत वीज दिली जाणार आहे. या बजेट मध्ये टॅक्स स्लॅब मध्ये बदल करण्यात आलेले नाहीत.

पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या घोषणा झाल्या यामध्ये 40 हजार साधे डबे वंदे भारत डब्यांमध्ये रूपांतरित करणार, लक्षद्विप सह देशातील बेटांचा विकास करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.