बीएसएफकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे-दारुगोळा जप्त (Photo Credits-ANI)

स्वातंत्र्य दिनापूर्वीच जम्मू-कश्मीर मध्ये होणारा दहशतवादी हल्ला सुरक्षाबलाच्या जवानांनी उधळून लावला आहे. बीएसएफने आज पुंछ मधील दहशतवाद्यांच्या एका ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त केला आहे. बीएसएफच्या मते, स्वातंत्र्य दिवसापूर्वी एक मोठा दहशतवादी हल्ला होणार होता. मात्र तो कट आता उधळण्यात आला आहे. पुंछच्या एका गावातील जंगलात बीएसएफ, आरआर आणि एसओजी पुंछ यांनी मिळुन संयुक्त अभियान सुरु केले. या दरम्यान एका ठिकाणी लपवण्यात आलेली हत्यारे आणि दारुगोळा मिळाला.

हत्यारे पुंछ मधील सांगड गावातील वन क्षेत्रातून जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेल्या हत्यारांमध्ये दोन एके-47 रायफल, चार एके-47 मॅगनीज, एक चिनी पिस्तुल, 10 पिस्टल मॅगनीजचा समावेश आहे. या संबंधित अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. सुरक्षा एजेंसिकडून अधिक तपास केला जात आहे. तसेच हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आले आहे. याची पुष्टी किश्तवाडच्या एसएसपी यांनी केली आहे.(Terror Funding Case: जम्मू काश्मीरमध्ये टेरर फंडिंग प्रकरणात एनआयएची मोठी कारवाई, अनेक ठिकाणी टाकले छापे)

Tweet:

रजौरी जिल्ह्यातील वनक्षेत्रात शुक्रवारी सुरक्षाबलासोबत झालेल्या गोळीबारात लश्कर-ए-तौयबाचे दोन दहशतवादी ठार मारले गेले आहेत. थानामंडी मधील एका वनक्षेत्रात असलेल्या सुदूर पंगई गावात पोलीस आणि जवानांकडून सुरु करण्यात आलेल्या संयुक्त अभिनायन सुरु केले होते. ज्यामध्ये दोन परदेशी नागरिकांसह काही दहशतवादी असल्याची सुचना मिळाली होती. गोळीबारादरम्यान लश्कराचे दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडील हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.