
मानवी नातेसंबंध या संकल्पनेला जबरदस्त छेद देणारी घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बिजनौर (Bijnor) येथे घडली आहे. येथे वयाने मोठ्या असलेल्या सख्ख्या भावानेच आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या सख्ख्या भावाची हत्या केली. आरोपीने स्वत:च्या पत्नीसह इतर तीन मित्रांची मदत घेत ही हत्या केली. प्राप्त माहितीनुसार हत्या झालेल्या व्यक्तीचे त्याच्या वहिणीवर म्हणजेच मोठ्या भावाच्या पत्नीवर प्रेम जडले होते. प्रदीर्घ काळ चोरीछुपे चाललेल्या या एकतर्फी पूर्णविराम देत वहिणीला थेट बायकोच करुया, या विचाराने या भावाला ग्रासले होते. आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी वारंवार तो वहिणीला छेडत असे. आपल्या या दीराचे चाळे पाहून वैतागलेल्या वहिणीने आपल्या पतीकडे याबाबत तक्रार केली होती.
बिजनौर पोलिसांना काही दिवसांपूर्वी एका इसमाचा मृतदेह शेतात सापडला होता. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती. मात्र, शवविच्छेदन अहवाल आणि पुढे आलेल्या काही पुराव्यांनतर पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सापडलेला मृतदेह कामिल नावाच्या व्यक्तिचा होता. पोलीस तपासात पुढे आले ही कामिल नावाच्या या व्यक्तिची हत्या त्याच्या सख्ख्या भावानेच केली आहे. या हत्या प्रकरणात मोठ्या भावासोबत त्याच्या तीन मित्रांचाही समावेश आहे. पोलिसांनी तपास करत मुख्य आरोपी, त्याचे साथिदार आणि पत्नीला ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधिक्षक संजीव त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कामिल हा मोठ्या भावाच्या पत्नीवर वाईट नजर ठेवत असे. त्याने दीन-तीन वेळा तिच्यावर जबरदस्तीही केली होती. मोठ्या भावाच्या पत्नीला तो आपली पत्नी म्हणून ठेऊ इच्छित होता. या मुद्द्यावरुन कामिल याच्यासोबत आरोपीचा अनेकदा वादही झाला होता. ती तुझी वहिणी आहे. नात्यामध्ये तू असे काही करुन नको. ते बरे नव्हे, अशी समज मृत कामिल याला वादाच्या वेळी आरोपीने अनेकदा दिली होती. तरीही आरोपीचा वहिणीला बायको करण्याचा हट्ट कायम होता.
अनेकदा सांगूनही न ऐकल्याने भोठा भाऊ चिडला. त्याने आपल्या भावाला कायमची अद्दल घडवायची ठरवली. त्यासाठी तो दूर करण्यासाठी आरोपीने त्याची हत्या करण्याचा कट रचला. प्राप्त माहितीनुसार आरोपीचे नाव दिलशाद असल्याचे समजते. (हेही वाचा, बलात्कार करताना अपयश, आरोपीने अल्पवयीन पीडितेला छतावरुन खाली फेकले)
हत्या केल्यानंतर आरपीने भावाचा मृतदेह एका शेतात फेकून दिला. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपी दिलशाद, त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले. या प्रकरणात आरोपीला साथ देणारे त्याचे तीन मित्र फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.